मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात, दोन ट्रकची समोरासमोर धडक

मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे जवळ दोन ट्रकच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक चालक जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. जखमी चालकावर तातडीने उपचार सुरू आहेत.

| Updated on: Apr 30, 2025 | 2:03 PM
1 / 7
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.

मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे जवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली.

2 / 7

या अपघातात एका ट्रेलरचा चालक जखमी झाला आहे.

3 / 7

यानंतर जखमी चालकाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

4 / 7

या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ट्रक आणि ट्रेलर समोरासमोर धडकल्याचे पाहायला मिळत आहे.

5 / 7

यातून हा अपघात किती भीषण होता, याचा अंदाज आपल्याला लावता येत आहे.

6 / 7

या अपघातामुळे महामार्गावर गेल्या अर्धा तासांपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.

7 / 7

वाहनांच्या लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us