आधी अभिनेत्याशी ब्रेकअप, मग दिग्गज क्रिकेटपटूसोबत मोडलं लग्न, आता असं आयुष्य जगतेय ही अभिनेत्री
तिचं आयुष्य चढ-उतारांनी भरलेलं आहे. मोठा संघर्ष करुन ती इथवर पोहोचली आहे. या प्रवासात रिलेशनशिप ब्रेकअप, लग्न, घटस्फोट हे सर्वकाही तिच्यासोबत झालं.

नताशा स्टेनकोविक सोशल मीडियावर खूप एक्टिव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 47 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. हार्दिक पंड्या सोबत लग्न मोडल्यापासून ती मुलगा अगस्त्य सोबत आनंदाने आयुष्य घालवत आहे. नताशाला फिटनेस क्वीन सुद्धा म्हटलं जातं. (Photo- Natasa Stankovic Instagram)

नताशाने मंगळवारी संध्याकाळी तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले. त्या फोटोंमधून तिचा फिटनेस दिसून येतोय. नताशाने हे फोटो आपल्या लेटेस्ट आयफोनमधून काढले आहेत. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलय , 'शिस्त हीच माझी शान आहे' (Photo- Natasa Stankovic Instagram)

नताशा मूळ भारताची नाहीय, ती सर्बियावरुन भारतात आली आहे. संघर्ष करुन ती इथवर पोहोचली आहे. भारतात आल्यानंतर तिचं नाव अली गोनीसोबत जोडलं गेलं. हा नातं फार काळ टिकलं नाही. अली आणि नताशा 'नच बलिए 9' शो मध्ये सहभागी झालेले. (Photo- Natasa Stankovic Instagram)

अलीशी ब्रेकअप झाल्यानंतर नताशा दिग्गज क्रिकेटर ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या जवळ आली. दोघांनी आधी डेट केलं मग लग्न. दोघांना एक मुलगा आहे. हार्दिक आणि नताशा आता वेगळे झालेत. त्यांचं लग्न मोडलं. आता अगस्त्य नताशाकडे असतो. (Photo- Natasa Stankovic Instagram)

नताशा आता मॉडलिंगसह सोशल मिडिया इन्फुलएन्सर म्हणूनही काम करते. फिटनेसवर तिचा जास्त फोकस असतो. ती जीममधले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Photo- Natasa Stankovic Instagram)