42 वर्षीय व्यक्तीने वाढलेले वजन झटपट केलं कमी; ‘या’ 4 सवयी ठरल्या गेमचेंजर

42 वर्षीय व्यक्तीने वाढलेले वजन झटपट कमी केलं. या व्यक्तीच्या 4 सवयी गेमचेंजर ठरल्या.

| Updated on: Aug 30, 2026 | 2:47 PM
1 / 5
मुंबईतील एका 42 वर्षीय व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे. या व्यक्तीने फारसा व्यायाम न करता वाढलेले वजन कमी केलं. त्याने चांगल्या सवयींचा स्वीकार करून 20 किलो वजन कमी केलं.

मुंबईतील एका 42 वर्षीय व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे. या व्यक्तीने फारसा व्यायाम न करता वाढलेले वजन कमी केलं. त्याने चांगल्या सवयींचा स्वीकार करून 20 किलो वजन कमी केलं.

2 / 5

फास्ट/जंक फूड केलं बंद बँकर असलेल्या व्यक्तीला पिझ्झा, बर्गर, मोमोज, शॉरमा खाण्याची आवड होती. यामुळे अधिक वजन वाढते. मैदा आणि साखर अधिक असलेले हे पदार्थ खाणे बंद केले.

3 / 5

गोड पदार्थ खाणे टाळले फास्ट फुड व्यतिरिक्त मैदा आणि गोड पदार्थ खाणे बंद केले. आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश केला. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ खाण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर चिकन, अंडी, सुकामेवा खाण्यास सुरुवात केली.

4 / 5

चालण्याची सवय जोपासली बँकरने दररोज चालण्यास सुरुवात केली. सकाळी 4 किलोमीटर, दुपारी जेवण केल्यानंतर 2 किमी, रात्री जेवल्यानंतर 5 किमी चालण्याचा निश्चय केला. त्यानंतर थोडाफार व्यायामगी सुरू केला.

5 / 5

झोपेच्या वेळेत केला बदल झोपेसाठी वेळापत्रक तयार केलं. झोपण्याच्या सुमारे 4-5 तास आधी जेवण करण्यास सुरुवात केली. दररोज ठरलेल्या वेळेत झोपण्याची सवय अंगिकारली. ज्यामुळे वजन कमी होणे सोपे झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us