Dhurandhar Movie : नागार्जुन धुरंधर मध्ये रहमान डकैतच्या रोलसाठी पहिली पसंत होता का? अभिनेत्याने मौन सोडलं, सत्य काय ते सांगितलं?
Dhurandhar Movie : सुपरस्टार रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर’ ब्लॉकबस्टर ठरला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरपूर यश मिळवलं. आता OTT वर सुद्धा या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटाने फॅन्सच मन जिंकलं.

रणवीर सिंह सोबत अक्षय खन्नाच्या कामाचं सुद्धा भरपूर कौतुक झालं. हमजाच्या रोलमध्ये रणवीरने आपली छाप उमटवली तेच अक्षय खन्नाच्या भूमिकेने प्रेक्षकांना वेड लावलं. त्याचही भरपूर कौतुक झालं. अक्षय खन्ना दीर्घकाळ त्याच्या रोलसाठी प्रेक्षकांच्या लक्षात राहीलं.

या सगळ्या चर्चांमध्ये आता अशी बातमी आलीय की, रहमान डकैतच्या रोलसाठी अक्षय खन्ना पहिली पसंत नव्हता. साऊथ सुपरस्टार नागार्जुनला हा रोल पहिला ऑफर झाला होता. आता नागार्जुनने या विषयात मौन सोडतं सर्व सत्य सांगितलं आहे.

धुरंधरच्या यशा दरम्यान अशी अफवा उडालेली की, अक्षयच्या आधी रहमान डकैतचा रोल मेकर्सनी नागार्जुनला ऑफर केला होता. पण या अफवांमध्ये काही दम नाहीय. दिग्गज अभिनेत्याने स्वत: हा खुलासा केलाय.

नागार्जुन म्हणाला की, कदाचित हा रोल मला मिळाला असता तर?. नागार्जुन सध्या परदेशात सुट्टया एन्जॉय करतोय. नागार्जुनने धुरंधरच कौतुक करताना सर्व अफवांवर ब्रेक लावलाय.

मला हा रोल ऑफर करण्यात आला नव्हता. मला हा रोल मिळावा अशी माझी इच्छा होती. धुरंधर एक शानदार चित्रपट आहे. आदित्य धरचं डायरेक्शन खरच लाजवाब आहे असं नागार्जुन बोलला.