पत्नीसोबत वाद सहन झाला नाही, पोलीसाने उचललं टोकाचं पाऊल, सगळेच हळहळले

पोलिसांवर अनेकदा ड्युटीसोबत कौटुंबिक ताणतणावही असतात. अनेक पोलीस बंधु खमकेपणाने या परिस्थितीचा सामना करतात. पण काहीवेळा मनोबल तुटतं. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. अशीच एक घटना नागपूर पोलीस दलात समोर आली आहे.

| Updated on: Feb 25, 2026 | 11:48 AM
1 / 5
अंबाझरी तलावात पोलीस हेडकॉन्स्टेबलने उडी मारुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर असे मृताचे नाव असून ते प्रतापनगर पोलिस ठाणे येथे कार्यरत होते.

अंबाझरी तलावात पोलीस हेडकॉन्स्टेबलने उडी मारुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शीलरत्न भीमराव बेलेकर असे मृताचे नाव असून ते प्रतापनगर पोलिस ठाणे येथे कार्यरत होते.

2 / 5

प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होता. मुलगा आठवीत तर मुलगी चौथीत शिकत असून दोघांचा ताबा त्यांच्याकडेच होता.

3 / 5

आज सकाळी आम्ही कर्तव्यावर हजर असताना आम्हाला फोन आला. अंबाझारी तलावात एक डेडबॉडी तरंगत आहे असा फोन आल्यानंतर सदर घटनास्थळी रवाना झालो अशी माहिती अंबाझरी पोलीस स्टेशनचे पीआय आदम शेख यांनी दिली.

4 / 5

अपत्यांच्या ताब्यावरून वारंवार वाद होत असल्याची माहिती आहे. 19 फेब्रुवारीपासून ते ड्युटीवर गैरहजर होते. रविवारी ते भावाच्या घरी आले होते. मात्र काही वेळाने घरातून निघाल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला.

5 / 5

बेपत्ता तक्रारीनंतर मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांना अंबाझरी तलावात मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खिशातील ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटवली. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us