दुसऱ्याशी का बोलते? त्याच्या संतापाचा पारा चढला अन् तो हैवानच बनला; नेमकं काय घडलं?

नागपूरच्या महाल परिसरात माजी प्रेयसीच्या इन्स्टाग्राम मैत्रीवरून झालेल्या वादातून १२-१५ दुचाकींची तोडफोड करण्यात आली. गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी ७ जणांना ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे.

| Updated on: Feb 25, 2026 | 1:19 PM
1 / 6
नागपूरच्या महाल परिसरात मंगळवारी रात्री जुन्या वादातून तरुणांच्या एका टोळक्याने मोठा धुमाकूळ घातला. एक्स गर्लफ्रेंडची इन्स्टाग्रामवर दुसऱ्या मुलाशी मैत्री झाल्याच्या रागातून एका तरुणाने अनेक दुचाकींची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.

2 / 6
या तरुणाने आपल्या साथीदारांसह गाडीखाना आणि जोहरीपुरा परिसरातील डझनभर दुचाकींची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे.

3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीच्या एक्स गर्लफ्रेंडची इन्स्टाग्रामवर दुसऱ्या एका मुलाशी मैत्री झाली होती. या मैत्रीमुळे आरोपी तरुण संतापला होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात यावरून वादही झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास १२ ते १५ तरुणांचे एक टोळके हातात धारदार शस्त्रे घेऊन महाल परिसरातील गाडीखाना भागात पोहोचले.

4 / 6
हे टोळके त्या विशिष्ट मुलाला शोधण्यासाठी आले होते.पण तो सापडला नाही. तेव्हा त्यांनी आपला राग रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर काढला.  यावेळी आरोपींनी तलवारी आणि इतर शस्त्रांच्या साहाय्याने परिसरातील सुमारे १२ ते १५ दुचाकींची तोडफोड केली.

5 / 6
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, काही धाडसी नागरिकांनी एकत्र येत तोडफोड करणाऱ्या टोळक्यातील काही जणांना जागीच पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली.

6 / 6
प्राथमिक तपासानुसार, या कृत्यात एकूण १२ ते १५ जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी तीन जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करत असून, फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू आहे.