हो, मीच नमाजचे ट्रेनिंग दिले! TCS प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानची कबूली

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील पोलिसांच्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. निदा खानने अनेक गोष्टींची कबुली दिली आहे.

| Updated on: Jun 07, 2026 | 2:11 PM
1 / 6
नाशिक येथील टीसीएस कंपनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. या कंपनीतील महिलांवार लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर केल्याचे गंभीर आरोप समोर आले. त्यानंतर राज्यात एकच खळबळ माजली. आता या प्रकरणी धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर चौकशीमध्ये निदा खानने 'हो, मीच नमाजचे ट्रेनिंग दिले!' अशी कबुली दिली आहे.

2 / 6
पोलीस चौकशीमध्ये निदाने मान्य केले आहे की तीच पीडितेला आपल्या घरी नेऊन नमाज पढण करायला शिकवत असे. पोलिसांना मोबाईलमधून ३७ इस्लामिक ऑडिओ क्लिप्स आणि ॲप्स सापडले आहेत, जे पीडितेच्या फोनमध्ये जबरदस्तीने इन्स्टॉल करण्यात आले होते. आरोपींनी पोलीस तपासात हेही उघड केले आहे की, TCS कार्यालयाच्या ७ व्या मजल्यावरील कॅफे या कटाचा मुख्य अड्डा होता. इथेच बसून दानिश, निदा आणि तौसीफ पीडितेच्या धर्मांतराचा संपूर्ण कट रचत असत.

3 / 6
नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात पीडितेने पोलिसांना दिलेल्या अधिकृत जबाबात आणखी एक दावा केला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी तौसीफ अत्तारने तिच्या वैयक्तिक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत तिला म्हटले होते की, "तुला मूल होत नाहीये, मी तुला अजमेरच्या एका मौलवीचा मोबाईल नंबर देतो. तिथे जाऊन आल्यावर तुला गॅरंटीने मूल होईल." पोलीस आता या अजमेर अँगल आणि मौलवीच्या कनेक्शनचाही सखोल तपास करत आहेत. निदा खान स्वतः पोलीस पथकाला आपल्या घरी घेऊन गेली आणि तिने ती खोली व तो कोपराही दाखवला, जिथे ती पीडितेला बोलावून नमाज पढणाचे रीतसर प्रशिक्षण देत असे.

4 / 6
पोलिसांना या प्रकरणात भक्कम डिजिटल आणि तांत्रिक पुरावे हाती लागले आहेत. पीडितेच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासणीदरम्यान इस्लाम धर्माशी संबंधित एकूण ३७ ऑडिओ क्लिप्स जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय, मोबाईलमध्ये अनेक यूट्यूब लिंक्स आणि मुस्लिम धर्माशी संबंधित ४ विशेष मोबाईल ॲप्सही आढळले आहेत. पोलीस तपासात हे स्पष्ट झाले आहे की, हे सर्व ॲप्स आरोपी दानिश आणि निदा यांच्या सांगण्यावरूनच पीडितेच्या फोनमध्ये इन्स्टॉल करण्यात आले होते.

5 / 6
पोलीस तपास अहवालातून हे समोर आले आहे की, वर्ष २०२५ च्या रमजान महिन्यात पीडितेवर केवळ मानसिक दबावच टाकण्यात आला नाही, तर तिला जबरदस्तीने इस्लामिक नियमांचे पालन करण्यास भाग पाडले गेले. मुख्य आरोपी दानिश आणि तौसीफ अत्तार यांनी पीडितेला पूर्ण ३० दिवस रोजे ठेवण्यास सांगितले होते. यादरम्यान निदा खान तिला रमजान सुरू होण्याच्या तारखा सांगत असे, तर दानिश तिला रोजे ठेवण्याची, तसेच सहरी आणि इफ्तारची योग्य वेळ ठरवून देत असे.

6 / 6
पोलिसांच्या आरोपपत्रात १०६ साक्षीदारांच्या जबाबांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारने टीसीएसच्या नाशिक कार्यालयात काम करणाऱ्या अनेक महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्नांच्या तक्रारींनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. टीसीएसने स्पष्ट केले होते की, कोणत्याही प्रकारचा छळ आणि बळजबरी खपवून न घेण्याचे त्यांचे धोरण आहे आणि नाशिक कार्यालयात कथित लैंगिक छळात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Follow Us