निसर्गाची किमया न्यारी! 1200 ते 1300 फूट उंचीवर अन् तब्बल 12 वर्षांनंतर उमलतात ही फुले, भारतातील एकाच ठिकाणी…
निसर्गात अनेक सुंदर फुलं पाहायला मिळतात. मात्र, केरळमधील मुन्नार येथे आढळणारं एक फूल विशेष आहे. हे फूल दर 12 वर्षांनी एकदाच फुलतं. त्यामुळे हे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

नीलकुरिन्जी हे फूल आपल्या दुर्मिळ फुलण्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. केरळमधील मुन्नार परिसरात ही फुलं मोठ्या प्रमाणात दिसतात. निसर्गप्रेमींसाठी हे दृश्य आकर्षणाचं केंद्र ठरतं.
या फुलाचा बहर पाहण्यासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागते. यापूर्वी 2006 आणि 2017 मध्ये ही फुलं फुलली होती. या फुलांमुळे मुन्नारच्या सौंदर्यात आणखी भर पडते.
नीलकुरिन्जीची फुलं साधारणपणे जुलैच्या सुरुवातीला फुलतात. त्यांचा बहर जवळपास 3 महिने पाहता येतो. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा हा सुंदर अनुभव घेण्याची संधी मिळते.
भारतात नीलकुरिन्जीच्या एकूण 46 प्रजाती आढळतात. त्यापैकी मुन्नार परिसरात या फुलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 2017 मध्ये 628,427 पर्यटकांनी मुन्नारला भेट दिली होती. 2016 मध्ये हा आकडा 467,881 होता. केरळ पर्यटन विभागाचे निर्देशक पी. बाला किरण यांनी सांगितले की, हे फूल फुललेले असताना मुन्नारला येणे सर्वात आनंददायी असते.