
IMDb च्या रेटिंगमध्ये 2023 मध्ये प्रदर्शित झालेला एक सुपरहिट चित्रपट अग्रस्थानी आहे. विधू विनोद चोप्रा यांचा 'बारवी फेल' या चित्रपटाला 8.7 रेटिंग मिळाली आहे. यामध्ये विक्रांत मेस्सीने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने अनेकांना प्रेरणा दिली.

दुसऱ्या क्रमांकावर 1987 मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट 'नायकन' आहे. यामध्ये कमल हासनने मुख्य भूमिका साकारली होती. तर मणिरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाने कमल हासन यांना करिअरच्या शिखरावर पोहोचवलं होतं. आयएमडीबीवर त्याला 8.6 रेटिंग आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर 1979 मध्ये प्रदर्शित झालेला 'गोलमाल' हा कल्ट क्लासिक चित्रपट आहे. अमोल पालेकर, उत्पल दत्त आणि बिंदिया गोस्वामी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केलं होतं. आयएमडीबीवर याला 8.5 रेटिंग आहे.

2003 मध्ये प्रदर्शित झालेला 'अन्बे शिवम' हा चित्रपट या यादीत चौथ्या स्थानी आहे. यामध्ये कमल हासन आणि आर. माधवन यांच्या मुख्य भूमिका होत्या. अभिनेत्री किरण राठोडने त्यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.6 रेटिंग आहे.

'अपूर संसार- वर्ल्ड ऑफ अप्पू' हा चित्रपट 1959 मध्ये प्रदर्शित झाला होता. सत्यजीत रे दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आयएमडीबीवर या चित्रपटाला 8.4 रेटिंग आहे. यामध्ये सौमित्र चॅटर्जी, शर्मिला टागोर आणि आलोक चक्रवर्ती यांच्या भूमिका आहेत.