Knwoledge : नवीन टायरवरचे हे छोटे काटे नेमके कशासाठी ? 99% लोकांना माहित नसेल उत्तर
तुम्हालाही नवीन टायरवर असलेले हे छोटे रबरचे काटे ग्रीप वाढवण्यासाठी असतात असे वाटत होते का ? पण त्याचा ड्रायव्हिंग किंवा ग्रीपशी थेट काहीही संबंध नाही. मग ते असतात तरी का ?

अनेकदा कार किंवा बाईकसाठी नवीन टायर खरेदी केलं जातं, तेव्हा त्यावर छोटे-छोटे रबरचे काटे किंवा केसांसारखे स्पाइक्स (Nib) दिसतात. अनेकांना असं वाटतं की हे स्पाइक्स रस्त्यावर गाडीची ग्रीप किंवा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी बनवलेले असतात. मात्र, यामागचं खरं कारण पूर्णपणे वेगळं आहे. हे काटे असतात तरी कशासाठी?

या छोट्या रबरच्या काट्यांना तांत्रिक भाषेत 'व्हेंट स्प्यूज' (Vent Spews) म्हणतात. त्यांचा टायरच्या ग्रीप, ब्रेकिंग किंवा ड्रायव्हिंग परफॉर्मन्सशी थेट संबंध नसतो. खरंतर टायर तयार करण्याच्या प्रक्रियेत हे काटे आपोआप तयार होतात.

टायर बनवताना कच्चं रबर एका विशेष साच्यात (Mold) ठेवून त्याला उष्णता आणि दाब दिला जातो. या प्रक्रियेत रबर आणि साच्यामध्ये हवा अडकू शकते. ही हवा बाहेर निघाली नाही, तर टायरच्या पृष्ठभागावर दोष निर्माण होऊ शकतात.

त्यासाठी साच्यामध्ये बारीक-बारीक व्हेंट होल्स ठेवलेले असतात. रबर साच्यात भरले जात असताना अडकलेली हवा या छिद्रांमधून बाहेर पडते.

मात्र, त्याच वेळी थोडेसे मऊ रबरही या छिद्रांमध्ये शिरतं. टायर तयार झाल्यानंतर आणि थंड झाल्यावर हे रबर घट्ट होतं आणि बाहेर आलेल्या छोट्या काट्यांच्या रूपात दिसतं. म्हणजेच, हे काटे म्हणजे टायरच्या निर्मिती प्रक्रियेत बाहेर आलेलं अतिरिक्त रबर असतं!

टायरच्या ट्रेडवर असलेले काटे गाडी चालवल्यानंतर रस्त्याशी घासले जाऊन हळूहळू नाहीसे होतात. पण साइडवॉलवरील काटे बऱ्याच काळापर्यंत दिसू शकतात. आणि हो—हे काटे ग्रीप, ब्रेकिंग किंवा रोड नॉइज कमी करण्यासाठी नसतात. त्यांचे मुख्य काम टायर तयार होताना साच्यातील अडकलेली हवा बाहेर जाण्यास मदत करणं हे आहे.

त्यामुळे आता नवीन टायरवर हे काटे दिसले, तर त्यांना ग्रीप वाढवणारे स्पाइक्स समजू नका!