IND vs NZ : पराभव म्हणजे दु:ख, पण भारताकडून पहिले दोन्ही टी20 सामने हरल्यानंतरही न्यूझीलंडचे हेड कोच खूश आहेत, का? कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध टी20 सीरीज सुरु आहे. टीम इंडियाने पहिल्या दोन्ही सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवून सीरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या या प्रदर्शनानंतरही त्यांचे हेड कोच त्यांच्यावर खुश आहेत.

टीम इंडियाकडून सलग दोन टी20 सामन्यात पराभूत झाल्यानंतरही न्यूझीलंडचे हेड कोच रॉब वॉल्टर खूश आहेत. टीमने चांगलं प्रदर्शन केलं, असं त्यांचं मत आहे. वॉल्टर यांच्यानुसार, त्यांची टीम दोन्ही सामन्यात विजयाच्या जवळ होती. पण महत्वाच्या क्षणी चुका झाल्या. (Photo: PTI)
आम्ही दोन्ही सामने आरामात जिंकू शकलो असतो, पण असं घडलं नाही असं रॉब वॉल्टर म्हणाले. काही ठिकाणी आम्ही चूका केल्या. जिथे मॅच आम्ही आमच्या बाजूला वळवू शकत होतो. त्यामुळे मी थोडा निराश आहे. पण आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्यावर आनंदी आहे. (Photo: PTI)
दुसऱ्या टी20 मध्ये न्यूझीलंडने पावरप्लेमध्ये तीन विकेट गमावले. तरी ते 180 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचले. वॉल्टरने फिन एलन आणि ग्लेन फिलिप्स यांचं कौतुक केलं. दोघांमुळे टीम या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली. फिन आणि ग्लेनने टीमला 180 धावांपर्यंत पोहोचवण्यासाठी शानदार काम केलं. एक बचाव करता येण्यासारखी टोटल होती असं वॉल्टर म्हणाले. (Photo: PTI)
कॅप्टन मिचेल सँटनरने चार विकेट काढले. त्याच्या गोलंदाजीचही कोच म्हणून वॉल्टर यांनी कौतुक केलं. पीचकडून फार मदत मिळत नसतानाही सँटनरने गती आणि चेंडूवर नियंत्रण राखून कमाल दाखवली. (Photo: PTI)
वॉल्टर यांनी एक गोष्ट मान्य केली की, दुसऱ्या मॅचमध्ये आम्ही खराब फिल्डिंग केली. "एका नो बॉल मुळे टीमचं खूप मोठं नुकसान झालं. आता उरलेल्या सामन्यात आम्ही कमबॅक आणि चांगलं खेळण्याचा प्रयत्न करु" असं वॉल्टर म्हणाले. (Photo: PTI)