या गावाची जगभर चर्चा, इथे पुरुष करतात साजशृंगार, लिपस्टीक लावून नाचतात, नंतर… थक्क करणारं कारण!

आपल्या भारत देशात आपण पाहत असतो की, महिला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि आभूषणे परिधान करतात; आधीच्या राजेमहाराजांच्या काळात पुरुष देखील काही विशिष्ट दागिने परिधान करत असत. सध्या बदलत्या काळानुसार पुरुषांच्या पोशाखात बरेच बदल झाले आहेत. मात्र, आफ्रिकेतील एक जमात आजही त्यांच्या एका विशिष्ट संस्कृतीसाठी ओळखली जाते.

| Updated on: Oct 18, 2026 | 4:22 PM
1 / 5
वोडाबे जमातीमध्ये गेरेवोल हा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर या उत्सवाचे आयोजन होते. या परंपरेत पुरुषांना विशेष महत्त्व असते.

वोडाबे जमातीमध्ये गेरेवोल हा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. पावसाळा संपल्यानंतर या उत्सवाचे आयोजन होते. या परंपरेत पुरुषांना विशेष महत्त्व असते.

2 / 5

या उत्सवात पुरुष चेहऱ्यावर पारंपरिक रंग लावतात. पिसे, मणी आणि आकर्षक पोशाखांनी ते स्वतःला सजवतात. महत्त्वात्वाचं म्हणजे या गावांमध्ये ज्याचे दात जास्त पांढरे आणि मोठ मोठे डोळे असतील त्या पुरूषाला सुंदर मानले जाते.

3 / 5

याके नृत्य हे उत्सवाचे खास आकर्षण असते. पुरुष नृत्य करताना चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांच्या हालचाली आणि हास्य यांचा वापर करतात. ते यामध्ये वेगवेगळे आवाज काढतात तसेच दात वाजवतात. या माध्यमातून ते आपले आकर्षक व्यक्तिमत्त्व दाखवतात.

4 / 5

या नृत्याच्या वेळी महिला पुरुषांचे सादरीकरण पाहतात. त्यांना आवडणाऱ्या पुरुषाची निवड करण्याची संधी मिळते. त्यामुळे हा उत्सव प्रेमसंबंध निर्माण करण्याचे एक माध्यम ठरतो.त्यानंतर ते लग्न बंधनात अडकतात.

5 / 5

वोडाबे जमातीची ही परंपरा जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेते. साजशृंगार आणि नृत्याला त्यांच्या संस्कृतीत विशेष स्थान आहे. या उत्सवातून त्यांची जीवनशैली आणि जोडीदार निवडण्याची पद्धत दिसून येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us