Ramayana Cast Fees : ‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीर कपूर, सनी देओल या अभिनेत्यांनी जी फि घेतलीय तो आकडा ऐकून तुम्ही अवाक व्हाल

Ramayana Cast Fees : धुरंधर 2 नंतर आता बॉलिवूडमध्ये रामायण चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. पहिल्या नजरेत या चित्रपटाची भव्यता लक्ष वेधून घेते. या चित्रपटाचं बजेट आणि कुठल्या कलाकाराने किती फि घेतली हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. भारतीय सिनेसृष्टीतील हा सर्वात महागडा सिनेमा असल्याचं बोललं जातय.

| Updated on: Apr 04, 2026 | 5:27 PM
1 / 5
नितेश तिवारी 'रामायण' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. अनेक मोठे स्टार्स या चित्रपटात काम करत असून त्यांनी तितकी फी सुद्धा घेतली आहे. या फिल्मच तब्बल 4000 कोटी इतकं मेगा बजेट आहे.  दोन पार्टमध्ये हा चित्रपट बनतोय.

2 / 5
या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांच्या फि बद्दल बोलायच झाल्यास रणबीर कपूरची सर्वात जास्त चर्चा आहे. या चित्रपटात तो प्रभू रामचंद्रांची भूमिका साकारतोय. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या एका भागासाठी त्याने 75 कोटी रुपये फि चार्ज केली आहे. म्हणजे दोन भाग मिळून त्याची फि 150 कोटी रुपये होते.

3 / 5
चित्रपटात साऊथचा सुपरस्टार यश रावणाची भूमिका करतोय. त्याने एका पार्टसाठी 50 कोटी रुपये चार्ज केल्याचं वृत्त आहे. म्हणजे दोन्ही भाग मिळून त्याची फि होते 100 कोटी.

4 / 5
सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे साऊथची अभिनेत्री साई पल्लवी. तिने सुद्धा चांगली रक्कम चार्ज केली आहे. रिपोर्ट्सनुसार एका पार्टसाठी तिने 6 कोटी रुपये घेतले आहेत. म्हणजे दोन्ही भागांचे मिळून तिची फि होते 12 कोटी रुपये.

5 / 5
हनुमंताच्या भूमिकेत दिसणाऱ्या सनी देओलची फि सुद्धा कमी नाहीय. त्याने हनुमंताच्या रोलसाठी 20 कोटी रुपये चार्ज केले आहेत. दोन्ही भागांचे मिळून 40 कोटी होतात. भारतीय सिने सृष्टीतील हा सर्वात महागडा सिनेमा असल्याचं बोललं जातय.

Follow Us