अंबांनींचे अँटिलिया नव्हे, भारतातलं सगळ्यात मोठं घरं म्हणजे…

जगातील सर्वात आलीशान घरांचा विषय निघाला असेल, आणि ते भारतात आहे, असं म्हटलं तर अनेकांच्या डोक्यात अँटिलियाचं नाव येईलं. पण असं नाहीये. जाणून घेऊया देसातील सर्वात मोठ्या पर्सनल रेसिडन्सबद्दल..

| Updated on: Oct 02, 2026 | 6:54 PM
1 / 6
देशातील सर्वात मोठ्या खासगी रेसिडन्सबद्दल सांगायचं झालं तर ते बडोदा येथे आहे. तो एक ऐतिहासिक महाल असून त्याचं नाव आहे, लक्ष्मी विलास पॅलेस.. अतिशय शानदार असलेला हाँ महाल त्यांच्या बारीक कलाकुसर आणि कारागिरीसाठा ओळखला जातो. यासमोर बकिंगहॅम पॅलेसही छोटा मानला जातो. (Image:tulsitoursandtravels)

देशातील सर्वात मोठ्या खासगी रेसिडन्सबद्दल सांगायचं झालं तर ते बडोदा येथे आहे. तो एक ऐतिहासिक महाल असून त्याचं नाव आहे, लक्ष्मी विलास पॅलेस.. अतिशय शानदार असलेला हाँ महाल त्यांच्या बारीक कलाकुसर आणि कारागिरीसाठा ओळखला जातो. यासमोर बकिंगहॅम पॅलेसही छोटा मानला जातो. (Image:tulsitoursandtravels)

2 / 6

लक्ष्मी विलास पॅलेस हे गुजरातच्या वडोदरा येथील शाही गायकवाड़ कुटुंबाचं निवासस्थान आहे, जे 500 एकर क्षेत्रफळात पसरलेलं आहे. येथे 170 पेक्षा जास्त खोल्या आहेत आणि 3 मोठी अंगणंही आहेत. त्याचबरोबर येथे टेनिस कोर्ट आणि शाही दरबार देखील आहे. याचे बांधकाम 1880 मध्ये सुरू होऊन 1890 मध्ये पूर्ण झाले. हे बांधकाम महाराजा सयाजीराव गायकोवाड तृतीय यांनी करवून घेतलं होतं.

3 / 6

बडोदाच्या गायकवाड राजघराण्याचे निवासस्थान असलेलं लक्ष्मी विलास पॅलेस 500 एकर परिसरात आहे. हा राजवाडा इंडो-सारासेनिक शैलीत बांधला गेला आहे, जो युरोपियन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. या राजवाड्यातील सुंदर रंगीत काचेच्या खिडक्यांपासून ते भव्य कोरीव कामामुळे ते खूप खास बनवतं या राजवाड्यात गोल्फ क्लब, क्रिकेट स्टेडियम, एक प्राचीन बावडी आणि अनेक बागा देखील आहेत.

4 / 6

गुजरातमधील बडोदा येथे स्थित या महालात 170 हून अधिक खोल्या आहेत. इथे एक शस्त्रागार, एक बॅडमिंटन कोर्ट, एक टेनिस कोर्ट आणि शाही दरबारही आहे, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांचे स्वागत केलं होते. सामान्य लोकही हे एक्सप्लोर करण्यासाठी येतात. मात्र अनेक ठिकाणी फोटोग्राफीची परवानगी नाही.

5 / 6

जगातील सर्वात मोठ्या खासगी निवासांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या पॅलेसचं डिझाइन ब्रिटिश वास्तुविशारद मेजर चार्ल्स मॅट यांनी तयार केलं होतं. लक्ष्मी विलास पॅलेस, महाराजा समरजीतसिंह रणजीतसिंह गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबाचं घर आहे. समरजीतसिंह गायकवाड यांच्या पत्नी राधिका राजे गायकवाड आहेत आणि पद्मजा राजे आणि नारायणी राजे अशा दोन मुली आहेत.

6 / 6

समरजीतसिंह, हे महाराजा सयाजीराव गायकवाड़ यांचे तिसरे वंशज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या काळात 60 लाख रुपयांचा खर्च करून हा पॅलेस बांधण्यात आला. पॅलेसच्या परिसरात दरवर्षी व्हिंटेज कार शो पासून ते डान्स फेस्टिव्हल आणि सांगितीक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us