NPS New Rules: NPS चे नवीन चार्ज 1 डिसेंबरपासून लागू होणार, PFRDA ने जारी केले महत्त्वाचे सर्कुलर

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) आणि NPS Lite शी संबंधित एका महत्त्वाच्या अपडेटमुळे खातेधारकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. पेन्शनशी संबंधित सेवांचा लाभ घेणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची असून, यामागील नेमकं कारण काय आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

| Updated on: Oct 29, 2026 | 10:49 AM
1 / 6
नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) आणि NPS Lite शी संबंधित नवीन शुल्क लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने हा निर्णय घेतला आहे. आता हे नवीन शुल्क 1 ऑक्टोबरऐवजी 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) आणि NPS Lite शी संबंधित नवीन शुल्क लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने हा निर्णय घेतला आहे. आता हे नवीन शुल्क 1 ऑक्टोबरऐवजी 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

2 / 6

PFRDA ने 26 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे नवीन शुल्क लागू करण्याच्या तारखेत बदल केला आहे. यापूर्वी 28 ऑगस्टच्या परिपत्रकात 1 ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. नवीन निर्देशानुसार, NPS आणि NPS Lite शी संबंधित शुल्कांसाठी आता 1 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.

3 / 6

PFRDA च्या सुधारित निर्देशानुसार, नवीन शुल्क रचना 1 डिसेंबरपासून लागू केली जाणार आहे. यासाठी सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सींना आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन तारखेनुसार शुल्काची कपात योग्य पद्धतीने होईल, याची जबाबदारी संबंधित एजन्सींवर असेल.

4 / 6

नवीन परिपत्रकात शुल्काची रक्कम किंवा शुल्कासंबंधीच्या नियमांमध्ये कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये केवळ नवीन शुल्क लागू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे 28 ऑगस्टच्या परिपत्रकातील इतर शुल्कविषयक तरतुदी पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.

5 / 6

पॉइंट्स ऑफ प्रेझेन्स (PoP) या NPS शी संबंधित सेवा पुरवणाऱ्या अधिकृत संस्था किंवा सेवा केंद्रांना म्हणतात. या केंद्रांमार्फत पेन्शन खाते उघडणे आणि खात्याशी संबंधित विविध व्यवहार करण्यास मदत मिळते. NPS अंतर्गत या सेवा देणाऱ्या PoP साठी सुधारित शुल्क रचना 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.

6 / 6

NPS आणि NPS Lite अंतर्गत कार्यरत असलेल्या संबंधित पॉइंट्स ऑफ प्रेझेन्सना नवीन शुल्क रचनेचा परिणाम होईल. सध्या उपलब्ध माहितीनुसार, शुल्काच्या नियमांमध्ये बदल नसून केवळ अंमलबजावणीची तारीख बदलण्यात आली आहे. त्यामुळे खातेधारकांनी नवीन शुल्क लागू होण्यापूर्वी PFRDA च्या अधिकृत सूचनांची माहिती घ्यावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us