
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. 19 एप्रिल 2023 या तारखेचा मूलांक 1 हा आहे. तर भाग्यांक 1+9+0+4+2+0+2+3 = 3 हा भाग्यांक असणार आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 19 ही जन्मतारीख असेल तर 1+9 असं करत मुलांक 1 येईल.

तुमच्या कुटुंबाला वेळ देण्याचा आजचा दिवस आहे. तुम्हाला यातून मानसिक समाधान मिळेल. सर्वकाही पैसा नसतो याची जाणीव तुम्हाला होईल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

आजचा दिवस तुमच्या लव्ह लाईफसाठी चांगला राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची चांगली साथ मिळेल. तसेच नवं काम सुरु करण्यासाठी चांगला दिवस असेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

दिवसभर तुम्हाला कसली तरी भीती जाणवत राहील. छोट्या छोट्या कारणांसाठी तुम्ही दु:खी व्हाल. काही गैरसमज वार्तालाप करून दूर करा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक राहील. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. त्यासोबत वडिलधाऱ्या व्यक्तींकडून मोलाचा सल्ला देखील मिळेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

अनेकदा चांगल्या मैत्रीसाठी स्वभाव कारणीभूत ठरतो. त्यामुळे वाणीवर नियंत्रण ठेवून चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. तसेच जोडीदारासोबत आपल्या मनातील व्यथा पूर्ण करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

आयुष्यात अडचणींचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. त्यामुळे खचून जाऊ नका. आजचा दिवस तुमचा नसला तरी आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा आहे.

तुमची क्षमता आणि तुमच्या कामाची पद्धत यामुळे तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. त्यामुळे आत्मविश्वास दुणावेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणाव दिसून येईल. तुमची कामं होता होता टळतील. त्यामुळे आजचा दिवस तसा चांगला नसेल. पण असं असलं तरी रागावर नियंत्रण ठेवा. दुसऱ्यांचा राग घरातील व्यक्तींवर काढू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहिल.

नवी सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. चिंता दूर करत कामाची सुरुवात करा. आजच्या दिवशी नवीन व्यक्तींशी भेटी गाठी होतील. कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)