दापोली समुद्रकिनारी कासव जाळ्यात अडकले, जाळे कापून जीवदान

दापोली तालुक्यातील मुरुड येथील बीचवर जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे. (Olive Ridley Turtle Rescue at Ratnagiri Dapoli)

| Updated on: May 30, 2021 | 12:46 PM
1 / 8
दापोली तालुक्यातील मुरुड येथील बीचवर जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे.

दापोली तालुक्यातील मुरुड येथील बीचवर जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले कासवाची यशस्वीरित्या सुटका करण्यात आली आहे.

2 / 8

दापोली तालुक्यातील मुरुड येथील बीचवरील ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य आणि ग्रामस्थांनी त्या कासवाला जीवनदान दिले.

3 / 8

दरवर्षी दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीची अनेक मादी कासव येतात. त्या ठिकाणी ते अंडी घालतात.

4 / 8

या कासवांच्या पिल्लांचे सरंक्षण करुन त्या ठिकाणचे ग्रामस्थ त्यांना सुरक्षित पुन्हा पाण्यात सोडण्याचे काम करतात.

5 / 8

ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य हे नेहमीप्रमाणे किनारपट्टीवर फेरफटका मारत असताना त्यांना याच जातीचे कासव आढळले.

6 / 8

त्यावेळी ते पूर्णपणे जाळ्यात फसलेले होते. त्याला हात पायही हलवता येत नव्हते.

7 / 8

त्यानंतर या ग्रामस्थांनी सर्व जाळे कापून गुरफटलेल्या जाळ्यातून कासवला यशस्वीरित्या सोडवले.

8 / 8

त्यानतंर त्याला पुन्हा समुद्रात सोडून जीवदान देण्यात आले. त्यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us