चित्रात सर्वात आधी काय दिसलं? पेंग्विन की माणसाचा चेहरा? उत्तरातून जाणून घ्या पर्सनॅलिटी
सध्या सोशल मीडियावर Optical Illusion च्या फोटोंवरून तुमचा स्वभाव कसा आहे हे ओळखलं जातं. सध्या देखील असाच एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी काय दिसलं हे सांगायचं आहे.

सोशल मीडियावर सध्या ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच नजरेचा भ्रम निर्माण करणारी चित्रे चर्चेत असतात. या चित्रांमध्ये काहींना सर्वप्रथम पेंग्विन दिसतो तर काहींना माणसाचा चेहरा दिसतो. तुम्हाला चित्रात आधी काय दिसले, यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काही मनोरंजक दावे केले जातात.
या चित्रात तुम्हाला सर्वप्रथम पेंग्विन दिसला असेल तर तुम्ही भावनिकदृष्ट्या समजूतदार आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहात असा या व्यक्तिमत्त्व चाचणीचा दावा आहे.
आयुष्यातील अनुभवांमधून शिकण्याची तुमची वृत्ती असते आणि योग्य गोष्टींसाठी संयम ठेवणे महत्त्वाचे वाटते, असेही यात म्हटले जाते. पण जर तुम्हाला आधी माणसाचा चेहरा दिसला असेल तर काय? वाचा पुढे
जर तुम्हाला सर्वप्रथम माणसाचा चेहरा दिसला असेल तर तुम्ही सामाजिक स्वभावाचे असून मैत्रीला महत्त्व देता असा या चाचणीचा दावा आहे. इतरांचे विचार ऐकून घेणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि लोकांशी सहज मैत्री करणे हे तुमच्या स्वभावाचे गुण असू शकतात असे यात सांगितले जाते.
मात्र, अशा ऑप्टिकल इल्युजन चित्रांमधून व्यक्तिमत्त्वाबद्दल केले जाणारे दावे मनोरंजनासाठी घ्यावेत. चित्रात आधी काय दिसते, यावरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा भावनिक बुद्धिमत्ता निश्चितपणे ठरवता येत नाही.