भारतात ही अभिनेत्री बॅन, तरी तिच्या सौंदर्यावर लाखो तरूण फिदा; कोण आहे ही अप्सरा?

ही अभिनेत्री एवढी सुंदर आहे की तिचे जगभरात चाहते आहेत. भारतात तर तिच्या मालिकेची एवढी क्रेझ असते की लोक रात्र-रात्र जागून तिच्या मालिका पाहतात.

| Updated on: Mar 02, 2026 | 4:29 PM
1 / 5
कलेला सीमा नसते. एखाद्या कलाकाराची कला देशांच्या सीमा पार करून जगभरात पोहोचते. म्हणूनच आज अभिनेते, अभिनेत्री, गायक यांचे जगभरात चाहते पाहायला मिळतात. भारतातील शहरुख खान, सलमान खान यासारखे अभिनेत्यांची जग जगभरात वेगळी क्रेझ असते. अशाच एका अभिनेत्रीचे भारतात लाखोंनी चाहते आहे.

2 / 5
या अभिनेत्रीचे नाव हानिया आमीर असे असून ती मूळची पाकिस्तानची आहे. पाकिस्तानी अभिनेत्री असली तरीही तिचे भारतात लाखोंनी चाहते आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध चांगलेच बिघडले. याच काळात भारताने पाकिस्तानातील अनेक यूट्यूब चॅनेल्स, सेलिब्रिटींचे सोशल मीडिया खाते भारतात बॅन केले.

3 / 5
यात हानिया आमीरचेही इन्स्टाग्राम खाते आहे. तिचे इन्स्टाग्राम खाते भारतात दिसत नाही. ती भारतात बॅन आहे. परंतु तिच्या अभिनयाचे चाहते भारत, पाकिस्तान तसेच जगभरात पाहायला मिळतात. तिच्या सौंदर्यावर अनेक तरुण फिदा आहेत.

4 / 5
हानिया आमीरची सध्या मेरी जिंदगी हो तुम ही मालिका खूपच चर्चेत आहे. या मालिकेत तिने केलेल्या कामाचे तोंडभरून कौतुक होत आहे. पाकिस्तानातील काही यूट्यूब चॅनेल्स आता भारतात दिसायला लागले आहेत. त्यामुळे या मालिकेच्या रुपात हानिया आमीरचे काम भारतात पाहायला मिळत आहे.

5 / 5
हानिया आमीरचे नाव काही दिवसांपूर्वी भारतातील गायक, रॅपर बादशाहा याच्याशी जोडले गेले होते. परंतु या सर्व अफवा आहेत, असे नंतर समोर आले होते. हानिया आमीर आता आणखी कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Follow Us