PHOTOS : आधी दर्शन घेतलं, मग भावूक झाल्या, पंकजा मुंडेंसोबत शिर्डीत नक्की काय घडलं?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्यापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे गुरुस्थान मंदिरात भावूक झाल्या. त्यांनी दर्शन घेतल्यानंतर पायऱ्यांवर बसून अश्रू ढाळले, यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी त्यांची चर्चा झाली.

| Updated on: Oct 05, 2025 | 2:47 PM
1 / 8
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील सध्या शिर्डीत आहेत.

2 / 8
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिर्डी दौऱ्यापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज शिर्डीतील गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

3 / 8
पंकजा मुंडे या भावूक झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. शिर्डीतील साईबाबांच्या या पवित्र भूमीत पंकजा मुंडेंनी दर्शन घेतले. यानंतर त्या गुरुस्थान मंदिरात गेल्या.

4 / 8
यावेळी दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे काही काळ मंदिराच्या आवारातील पायऱ्यांवर बसलेल्या दिसल्या. याचवेळी भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या जवळ येत विचारपूस केली.

5 / 8
पंकजा मुंडे आणि स्नेहलता कोल्हे यांच्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. त्या दोघीही जुन्या राजकीय सहकारी आहेत.

6 / 8
पंकजा मुंडे यांनी यावेळी पिवळ्या रंगाची साडी घातली होती. यावेळी त्या मंदिरातील पायरीवर बसून भावूक झाल्याचे दिसत आहेत.

7 / 8
शिर्डीत झालेल्या या घडामोडींमुळे पंकजा मुंडे यांच्या मनात नेमके काय चाललं आहे आणि त्या अशाप्रकारे भावूक का झाल्या, याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

8 / 8
मात्र पंकजा मुंडे अशाप्रकारे भावूक का झाल्या, यामागचे कारण काय, याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. तसेच पंकजा मुंडे आणि स्नेहलता कोल्हे यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे.