Peddi : जगभरात ‘पेड्डी’चा डंका, पहिल्याच दिवशी राम चरणने रचला मोठा इतिहास, कमाईचा आकडा थक्क करणारा

Peddi : ग्लोबल स्टार राम चरण याने पुन्हा स्वतःला बॉक्स ऑफिसवर सिद्ध करुन दाखवलं आहे. अभिनेत्याचा 'पेड्डी' सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली. 4 जून रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाने पहिल्याच दिवशी मोठा इतिहास रचला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'पेद्दी' सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

| Updated on: Jun 06, 2026 | 10:14 AM
1 / 5
फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील अभिनेता राम चरण स्टारर 'पेड्डी' सिनेमाचा डंका वाजत आहे. या सिनेमाने ओव्हरसीज मार्केटमध्ये देखील आपली मजबूत उपस्थिती दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर, या सिनेमाने पहिल्याच दिवशी जवळपास 30 कोटी रुपयांची कमाई केली.

फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील अभिनेता राम चरण स्टारर 'पेड्डी' सिनेमाचा डंका वाजत आहे. या सिनेमाने ओव्हरसीज मार्केटमध्ये देखील आपली मजबूत उपस्थिती दर्शवली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर, या सिनेमाने पहिल्याच दिवशी जवळपास 30 कोटी रुपयांची कमाई केली.

2 / 5

पहिल्याच दिवशी 'पेड्डी' सिनेमाच्या वर्ल्डवाइड कमाईचा आकडा जवळपास 112.49 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या धमाकेदार सुरुवातीनंतर, हा सिनेमा तेलुगू सिनेमातील त्या निवडक ब्लॉकबस्टर सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे.

3 / 5

सिनेमाला देशभरात मोठ्या स्केलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाचे 12 हजार 412 शो झाले, सकाळपासूनच सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची चित्रपटगृहाबाहेर गर्दी जमलेली दिसत आहे. पेड प्रिव्ह्यू शोमधून मिळालेली कमाईदेखील समाविष्ट केल्यास, सिनेमाचे भारतातील निव्वळ कलेक्शन अंदाजे 69.50 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

4 / 5

'पेड्डी' सिनेमाने भारतात पहिल्याच दिवशी अंदाजे 82.49 कोटी रुपयांची कमाई केली आहे. राम चरणच्या सिनेमाच्या या उत्तुंग सुरुवातीमुळे हे स्पष्ट झालं आहे की, येत्या काळात हा सिनेमा आणखी अनेक विक्रम मोडणार आहे. कमाईचा वेग पाहता सिनेमा पहिल्याच वीकेंडमध्ये 300 कोटी रुपयांचा टप्पा सहज पार करेल... असं देखील सांगण्यात येत आहे.

5 / 5

'पेड्डी'च्या प्रचंड कमाईचा मोठा वाटा त्याच्या मूळ तेलुगू भाषेतून आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील चित्रपटगृहांमध्ये या सिनेमासाठी एक वेगळाच उत्साह दिसून येत आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत सिनेमा किती कोटींपर्यंत बाजी मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us