Penny Stock : बाजारात या छोटूरामची कमाल; सातत्याने अपर सर्किट, गुंतवणूकदारांना लॉटरी

Multibagger Stock: या मल्टिबॅगर पेनी स्टॉकने एका महिन्यात 36 टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. तर सहा महिन्यात हा स्टॉक 104 टक्क्यांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

| Updated on: Nov 15, 2025 | 3:38 PM
1 / 6
Deep Diamond India Share: शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात शुक्रवारी पेनी स्टॉकची चलती दिसली. ज्वेलरी सेक्टरमधील कंपनी  दीप डायमंड इंडिया, मध्ये तर सर्वाधिक तेजी दिसून आली. हा शेअर सध्या दहा रुपयांच्या आत खरेदी करता येतो.

2 / 6
 शुक्रवारी या शेअरमध्ये दिवसभर 4.90 टक्क्यांचं अपर सर्किट लागलेलं होतं. या दिवशी पेनी स्टॉकने  8.55 रुपये प्रति शेअरवर व्यापार केला. तर गुरुवारी हा शेअर  8.16 रुपयांवर बंद झाला होता. यापूर्वी सुद्धा सलग दोन दिवस या शेअरमध्ये अपर सर्किट लागले होते.

3 / 6
हा मल्टिबॅगर स्टॉक तेजीत आहे. एका महिन्यात या शेअरने 36 टक्क्यांपर्यंत झेप घेतली. तर केवळ सहा महिन्यात 104 टक्क्यांचा जोरदार मल्टिबॅगर रिटर्न दिला. मे 2025 मध्ये या शेअरची किंमत 3.55 रुपये प्रति शेअर होती. हा गेल्या 52 आठवड्यातील निच्चांक होता. तर 52 आठवड्यातील उच्चांक 10.04 रुपये होता. गेल्या महिन्यात कंपनीने तो गाठला होता.

4 / 6
एक्सचेंज फायलिंग दरम्यान कंपनीने येत्या काही दिवसात डीप हेल्थ इंडिया एआय नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आणणार असल्याचे सांगितले. हा कॅमेरा बेस्ड वेलनेस प्लॅटफॉर्म असेल. तो चेहरा स्कॅन करून रिअल टाईम आरोग्याविषयी माहिती देईल. हा प्लॅटफॉर्म येत्या 25 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.

5 / 6
या मल्टिबॅगर पेनी स्टॉकने एका महिन्यात 36 टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. तर सहा महिन्यात हा स्टॉक 104 टक्क्यांवर पोहचला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे

6 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.