Gold Investment : एका वर्षात चक्क पैसा डबल! सोन्यामुळे लोकांचं नशीबच पालटलं, अनेकजण झाले मालामाल!

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भावात चांगलीच वाढ झाली आहे. हाच वाढलेला दर काही लोकांना श्रीमंत करून गेला आहे. गेल्या दीड किंवा वर्षभरापूर्वी सोन्यात गुंतवलेल्या लोकांचे पैसे थेट दुप्पट झाले आहेत.

| Updated on: Sep 13, 2025 | 8:45 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. हीच बाब लक्षात घेऊन वर्षभरापासून सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. आता याच गुंतवणूकदरांना त्यांनी सोन्यात गुंतवलेल्या पैशांचा फायदा झालेला दिसत आहे.

2 / 5
 जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या वाढलेल्या दराचा फायदा करून घेण्यासाठी सोने मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दरात वाढ होत असल्यामुळे सोन्याने चांदीचे दर विक्रमी उच्चांकी वर पोहोचले आहेत.

3 / 5
सध्या सोन्याचा जीएसटीसह दर हे एक लाख 13 हजार 500 रुपयांवर तर चांदीचा जीएसटीसह दर 1 लाख 33 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे. कमी भावात घेतलेल्या सोन्याला आज चांगला परतावा मिळत असल्याने सोने मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

4 / 5
चांगला परतावा मिळत असल्याने सोन्याची मोड करण्यासाठी ग्राहकांची सराफ बाजारात दुकानामध्ये गर्दी होत असल्याचे चित्र आहे. पुढील दिवसात भाव कमी झाले तर नुकसान होण्यापेक्षा आजच आहे त्या दरात सोन मोड करून फायदा करून घेत असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

5 / 5
वर्षभरातच खरेदी केलेल्या सोन्याला दुप्पट आणि चांगला परतावा मिळत असल्याने सोन मोड करण्याकडे ग्राहकांचा कल वाढल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आगामी काळातही सोन्याचा भाव अशीच भरारी घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.