सामान्यांना सर्वात मोठा दणका, पेट्रोलचा भाव 25 रुपयांनी वाढणार? लवकरच…चिंता वाढली!

आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत वाढलेली आहे. आता निवडणुका संपल्यानंतर भारतात पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही भाववाढ 25 रुपयांनी होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

| Updated on: Apr 22, 2026 | 10:45 PM
1 / 5
सामान्यांना सर्वात मोठा दणका, पेट्रोलचा भाव 25 रुपयांनी वाढणार? लवकरच…चिंता वाढली!

2 / 5
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटिज या ब्रोकर फर्मने विधानसभेच्या निवडणुका झाल्या की पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. 29 एप्रिल रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान आहे. तोपर्यंत पेट्रोल, डिझेलची किंमत वाढणार नाही, असे मत व्यक्त केले जात आहे.

3 / 5
पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढवायचा असेल तर तो 29 एप्रिल नंतरच वाढवला जाऊ शकतो. सध्या कच्च्या तेलाचा भाव 112 रुपये प्रति बॅरल आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाचा वाढता भाव लक्षात घेता पेट्रोलचा भाव 25 ते 28 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

4 / 5
कच्च्या तेलाची किंमत वाढल्याने भारताला या तेलाची आयात करताना अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. आयात साधारण 13 ते 15 टक्क्यांपर्यंत घटली आहे. तरीही या आयातीसाठीचा खर्चा मात्र वाढला आहे. त्यामुळेही हा खर्च भरून काढण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढू शकतो, असे म्हटले जात आहे.

5 / 5
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीचा हा फक्त अंदाज आहे. प्रत्यक्ष निवडणूक संपल्यानंतरच पेट्रोल प्रति लिटरमागे किती रुपयांनी वाढणार तसेच ही भाववाढ प्रत्यक्षात होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us