फलटण महिला डॉक्टर प्रकरणात मोठा ट्विस्ट! WhatsApp चॅटींगमध्ये… भाजप मंत्र्याने नेमकं काय सांगितलं?

Phaltan Woman Doctor Case: गेल्या काही दिवसांपासून फलटण महिला आत्महत्या प्रकरणाने राज्यत खळबळ माजली आहे. या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. आता भाजपच्या एका मंत्र्याने केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

Updated on: Nov 01, 2025 | 11:48 AM
1 / 6
मूळची बीडची असलेली महिला डॉक्टर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करत होती. दोन वर्षांपासून काम करत असलेल्या महिला डॉक्टरने अचानक आत्महत्या केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी हातावर नोट लिहिली. या नोटमध्ये प्रशांत बनकर आणि पीएसआय गोपाल बदने यांच्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे.

2 / 6
महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तिघांच्या मोबाईल चॅटींगमध्ये एक वेगळाच ट्रँगल असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे.

3 / 6
जयकुमार गोरे यांनी सांगितले की, आम्ही त्या भगिनीचा आदर करतो. मात्र मोबाईल चॅटिंगवरून जो ट्रँगल समोर आला आहे, तो गंभीर असून लोकांसमोर आणण्यासारखा नाही. त्यामुळे कुणीही यावर राजकारण करू नये.

4 / 6
पुढे ते म्हणाले की, फलटण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आहेत. तिन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कधी सुसाईड नोटवरील हस्ताक्षर तिचे नसल्याचे आरोप होतात. मग कुटुंबीय हे हस्ताक्षर तिचेच असल्याचं सांगतात. या जप्त केलेल्या तिन्ही मोबाईलमधील चॅटिंग बघितलं तर परिस्थिती खूप वेगळी आहे.

5 / 6
आपण मृत भगिनीचा आदर करतो आणि त्यामुळेच पोलीस ही वस्तुस्थिती समोर आणत नाहीत. मात्र याचा गैरफायदा घेत काही लोक घाणेरडे राजकारण करत आहेत असे जयकुमार गोरे यांनी म्हटले.

6 / 6
राज्यभरातून महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. आता या प्रकरणी आणखी नवी माहिती काय समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.