फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक

फोटो, इमेज आणि पिक्चर हे शब्द अनेकदा एकाच अर्थाने वापरले जातात, पण त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. जाणून घेऊया तिघांमधला नेमका फरक

| Updated on: Aug 25, 2026 | 6:13 PM
1 / 6
जेव्हा आपण आपल्या कॅमेऱ्याने काहीतरी क्लिक करतो, तेव्हा  काही लोक फोटो म्हणतात, तर काही जण इमेज किंवा पिक्चर म्हणतात. पण खरं तर या तिन्ही शब्दांमध्ये थोडा फरक आहे. फोटो, इमेज आणि पिक्चर हे शब्द एकसारखे वाटतात, पण त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. (Image Source - iStock)

जेव्हा आपण आपल्या कॅमेऱ्याने काहीतरी क्लिक करतो, तेव्हा काही लोक फोटो म्हणतात, तर काही जण इमेज किंवा पिक्चर म्हणतात. पण खरं तर या तिन्ही शब्दांमध्ये थोडा फरक आहे. फोटो, इमेज आणि पिक्चर हे शब्द एकसारखे वाटतात, पण त्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. (Image Source - iStock)

2 / 6

फोटो : कॅमेरा, फोन किंवा DSLR ने घेतलेलं वास्तविक आयुष्यातील छायाचित्र म्हणजे फोटो. फोटोमध्ये एखादं वास्तविक दृश्य जसं दिसतं तसंच कॅप्चर केलं जातं. उदाहरणार्थ, पासपोर्ट आकाराचा फोटो किंवा मोबाईलने काढलेला सेल्फी.

3 / 6

इमेज: हा सर्वात व्यापक शब्द आहे. यात फोटोंसोबत डिजिटल ग्राफिक्स आणि संगणकाद्वारे तयार केलेल्या दृश्यांचाही समावेश होतो. इमेज डिजिटल किंवा व्हर्च्युअल असू शकते आणि ती सहजपणे संपादित करता येते. तुमच्या संगणकावरील कोणतीही ग्राफिक फाइल इमेज मानली जाऊ शकते. उदाहरणार्थ, Google वरून डाउनलोड केलेला कोणताही लोगो.

4 / 6

पिक्चर : पिक्चर म्हणजे चित्र. हा एक सामान्य आणि जुना शब्द आहे, ज्याचा वापर चित्रं आणि स्केचेससाठी केला जातो. मुलांनी काढलेली चित्रं किंवा पुस्तकांमध्ये छापलेली चित्रं यांना पिक्चर म्हटलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कागदावर पेन्सिलने काढलेलं चित्र.

5 / 6

फोटो, इमेज आणि पिक्चर हे शब्द अनेकदा एकमेकांच्या जागी वापरले जातात. मात्र, तिन्हींचे अर्थ थोडे वेगळे आहेत.

6 / 6

फोटो म्हणजे कॅमेऱ्याने वास्तविक दृश्य कॅप्चर केलेलं छायाचित्र. इमेज हा डिजिटल व्हिज्युअलसाठी सर्वात व्यापक शब्द आहे. तर पिक्चर हा सामान्यतः कोणत्याही चित्रासाठी, ड्रॉइंगसाठी किंवा फोटोसाठी वापरला जाऊ शकतो. ( (डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे. )

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us