चांदीवर 900, 925, 800 हे आकडे कसले असतात ? खरेदी करण्याआधी जाणून घ्या

चांदीच्या हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना मौल्यवान धातूच्या दागिन्यांची शुद्धता पडताळून पाहणे शक्य होते. सध्या, चांदीच्या दागिन्यांसाठी ही प्रक्रिया 2005 पासून ऐच्छिक आहे, तर सोन्याच्या दागिन्यांसाठी ती जून 2021पासून अनिवार्य करण्यात आली आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 12:45 PM
1 / 6
चांदीचे हॉलमार्किंग म्हणजे काय? - चांदीच्या हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना या मौल्यवान धातूच्या दागिन्यांची शुद्धता त्रयस्थ संस्थेकडून करुन मिळते, ज्यामुळे ग्राहकांना शुद्ध चांदी मिळण्याची खात्री होते.मात्र, सध्या चांदीच्या दागिन्यांसाठी ही प्रक्रिया ऐच्छिक आहे, परंतु जून 2021 पासून सोन्याच्या दागिन्यांसाठी ती अनिवार्य करण्यात आली आहे.

चांदीचे हॉलमार्किंग म्हणजे काय? - चांदीच्या हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना या मौल्यवान धातूच्या दागिन्यांची शुद्धता त्रयस्थ संस्थेकडून करुन मिळते, ज्यामुळे ग्राहकांना शुद्ध चांदी मिळण्याची खात्री होते.मात्र, सध्या चांदीच्या दागिन्यांसाठी ही प्रक्रिया ऐच्छिक आहे, परंतु जून 2021 पासून सोन्याच्या दागिन्यांसाठी ती अनिवार्य करण्यात आली आहे.

2 / 6

भारतीय मानक ब्युरोने(BIS) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत BIS कडे 25 हजाराहून अधिक चांदीचे दागिने विक्रेते हॉलमार्किंगसाठी नोंदणीकृत झाले आहेत. तसेच 102 जिल्ह्यांमध्ये 341 चांदीचे 'असेइंग अँड हॉलमार्किंग सेंटर्स' (AHCs) कार्यरत आहेत. चांदीचे दागिने आणि कलाकृतींसाठीच्या हॉलमार्किंग योजनेअंतर्गत, हॉलमार्क केलेले चांदीचे दागिने विकण्यासाठी विक्रेत्यांना 'IS 2112 - चांदी आणि चांदीच्या मिश्रधातूंचे दागिने आणि कलाकृती - शुद्धता आणि चिन्हांकन' (Fineness and Marking) या भारतीय मानकानुसार नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.

3 / 6

चांदीच्या हॉलमार्किंगचे महत्त्व काय आहे? - विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2005 पासून चांदीचे हॉलमार्किंग ऐच्छिक असले तरी, सप्टेंबर 2025 पासून हॉलमार्क केलेल्या चांदीच्या वस्तूंवर विशिष्ट क्रमांक (HUID) असणे आवश्यक असेल. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 32 लाख चांदीच्या दागिन्यांवर HUID शिवाय हॉलमार्किंग करण्यात आले होते.

4 / 6

BIS च्या आकडेवारीनुसार, चांदीच्या हॉलमार्किंगच्या प्रमाणात दक्षिण भारतीय राज्ये (62%) आघाडीवर आहेत; त्यानंतर पश्चिम विभाग (18 %) आणि मध्य विभाग (10 %) यांचा क्रमांक लागतो. मागणीचा विचार करता, 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 345 जिल्ह्यांतील 4,971 प्रतिसाद दिला आहे. BIS च्या बाजारपेठ सर्वेक्षणातून असे दिसून येत की, 10-25 ग्रॅम आणि 25-50 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तूंना सर्वाधिक मागणी होती. एकूण प्रतिसादांपैकी 74 % वाटा याच श्रेणींचा होता.चांदीच्या दागिन्यांच्या बाबतीत, BIS सर्वेक्षणानुसार पैंजण, साखळ्या (chains), जोडवी, अंगठ्या आणि ब्रेसलेट यांसारख्या चांदीच्या वस्तूंना सर्वाधिक मागणी आहे.

5 / 6

शुद्धतेच्या श्रेणीचा (Grade) विचार करता,925 आणि 800 या शुद्धता श्रेणींमधील चांदीच्या वस्तूंचा हॉलमार्क केलेल्या एकूण वस्तूंमध्ये सुमारे 95 % वाटा आहे आणि सर्वाधिक विकल्या गेलेल्या हॉलमार्क केलेल्या चांदीच्या वस्तूंमध्येही याच श्रेणींचा समावेश आहे. जे ग्राहक हॉलमार्क नसलेल्या चांदीची निवड करतात, त्यांना ती पुन्हा विकताना आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. कारण तपासणीत चांदीची शुद्धता दाव्यांपेक्षा कमी असल्याचे आढळू शकते. वा बाजारातील दरांनुसार त्याचे मूल्य कमी असू शकते.

6 / 6

हॉलमार्क कसा ओळखावा? त्याचे प्रकार कोणते आहेत? - हॉलमार्क असलेल्या चांदीच्या प्रत्येक दागिन्यावर BIS स्टँडर्ड मार्क, 'SILVER' हा शब्द, दागिन्याची शुद्धता दर्शवणारी श्रेणी आणि सप्टेंबर २०२५ पासून लेझरद्वारे अंकित केलेला सहा-अंकी 'HUID' (अल्फान्यूमेरिक कोड) असतो. त्यामुळे चांदी खरेदी करण्याआधी तुम्ही 'BIS CARE' ॲपवर HUID चा वापर करून दागिन्यांशी संबंधित तपशील डिजिटल पद्धतीने तपासू आणि पडताळून पाहू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us