सोने खरेदीत या दोन पिठुकल्या राष्ट्रांनी देखील मारली बाजी, भरला खजाना, चीनलाही मागे टाकले
जिओ-पॉलिटिक तणावात वाढ झाल्याने आता जग सुरक्षित संपत्ती आणि गुंतवणूकीकडे वळली आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे केंद्रीय बँकांनी मजबूत सोने खरेदी सुरु केली आहे. जगातील बहुतांशी देश सोन्याचा रिझर्व्ह वाढवत आहेत. आधी मोठे देश हे काम करायचे. मात्र आता छोटे देश देखील सोने खरेदी मुसंडी मारताना दिसत आहे.

जगात तणाव आणि अस्थिर वातावरण असल्याने सोन्याच्या गुंतवणूकीकडे जगातील मोठे देश वळले आहेत.काही देशांनी एका- एका महिन्यात इतकी सोने खरेदी केले आहे चीन आणि भारतासारख्या देशाला या छोट्या देशांनी मागे टाकले आहे.

जगातल्या पोलंड आणि उझबेकिस्तान या छोट्या देशांनी काही वर्षातच आपला गोल्ड रिझर्व्ह खूप वाढवला आहे. आणि फेब्रुवारी दरम्यान सोने खरेदीत चीन-भारत सारख्या देशांना या छोट्या देशांनी मागे टाकले आहे आणि मजबूत सोने खरेदी केली आहे.

पोलंडची गोल्ड खरेदी : फेब्रुवारीत पोलंडने २० टन सोन्याची खरेदी केली आहे.ही फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक सोन्याची खरेदी आहे. या खरेदीमुळे पोलंडचे एकूण गोल्ड रिझर्व्ह ५७० टन इतके झाले आहे. एक वर्षात पोलंडने सुमारे १०२ टन सोने खरेदी केले आहे.

उझबेकिस्तानकडे किती सोने : पोलंड सोबत उझबेकिस्तानने देखील भरपूर सोने खरेदी केली आहे.फेब्रुवारीत या छोट्या देशाने ८ टन सोन्याची खरेदी केली आहे. याचा सोन्याचा साठा ४०७ टनापर्यंत पोहचला आहे. साल २०२५ मध्ये उझबेकिस्तानने सुमारे १० त १५ टन सोने जमा केले आहे.

भारताकडे किती सोने: भारताने फेब्रुवारी महिन्यात जास्त सोन्याची खरेदी केली नव्हती. आकडेवारीनुसार फेब्रुवारीत भारताची सोने खरेदी ०.२ टन होती. तर साल २०२५ मध्ये भारताचा गोल्ड रिझर्व्ह ८८० टन होता. एक वर्षात भारताने २७ टन सोने खरेदी केले.