
आज राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. यातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जनता कुणाच्या बाजूने आहे, याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

2 हजार 359 जागांसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर आज मतमोजणी होत आहे. 1 हजार 653 जागांचा निकाल सध्या समोर आला आहे.

ग्रामपंचायतींमध्ये 549 जागांवर भाजचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे उमेदवार 295 जागांवर निवडून आले आहेत.

एकनाथ शिंदे गटाला 214 जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेस 122 तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 102 जागांवर विजय मिळाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर झालेल्या या निवडणुकीत ठाकरे गट पिछाडीवर असल्याचं दिसतंय. या निकालांमध्ये ठाकरेंची शिवसेना पाचव्या स्थानावर आहे.