वाढदिवसाचं औचित्य, शिंदेंचा मुख्यमंत्री बनण्याचा इरादा पक्का? ठाण्यातील पोस्टर्सनी चर्चांना उधाण

| Updated on: Feb 07, 2022 | 3:33 PM

Eknath Shinde Posters as Future CM : एकनाथ शिंदे हे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत. आपल्या मतदारसंघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार, अशी जेव्हा चर्चा सुरु झाली होती, तेव्हा एनाथ शिंदे यांचं नावही स्पर्धेत घेतलं जातं होतं.

1 / 5
मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांचं नाव सुरुवातीच्या टप्प्यात चर्चेत होतं खरं. पण आता तर चक्क त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरचं ठाण्यात झळकल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून त्या पार्श्वभूमीवर हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

2 / 5
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात नगरविकास मंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर झळकले. या पोस्टरमध्ये शिंदेच्या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचं नाव टाकून भावी मुख्ममंत्री असं लिहिण्यात आलंय.

3 / 5
येत्या 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर 4 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस झाला. दोघा पितापुत्रांना शुभेच्छा देणाऱ्या ठाण्यातील पोस्टर्सही सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय.

4 / 5
वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री, अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. दरम्यान, अजूनतरी यावर कोणतीही प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेली नाही.

5 / 5
एकनाथ शिंदे हे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहे. आपल्या मतदारसंघात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार, अशी जेव्हा चर्चा सुरु झाली होती, तेव्हा एनाथ शिंदे यांचं नावही स्पर्धेत घेतलं जातं होतं. आता चक्क त्यांच्या नावाखाली भावी मुख्यमंत्री असं लिहीत कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यानं नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय.