Pooja Bhatt : बॉबी देओलसोबतचे माझे प्रेमसंबंध म्हणजे तो माझ्या आयुष्यातील…पूजा भट्टने स्पष्टपणे सगळं मनातलं सांगितलं
Pooja Bhatt : बॉबी देओलची सुरुवातीची ओळख म्हणजे धर्मेंद्र यांचा मुलगा. पण आज त्याने अभिनयाच्या बळावर स्वत:च इंडस्ट्रीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आश्रम वेब सीरीजमुळे बॉबी देओलच्या करिअरला पुन्हा एकदा दिशा मिळाली. बॉबी देओलच्या लग्नाला जवळपास 30 वर्ष होत आली. तान्या देओलसोबत बॉबीने लग्नगाठ बांधली.

लग्नाआधी बॉबी देओल एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात होता, तिचं नाव पूजा भट्ट. तिचं पूजा भट्ट जी आज अभिनेत्री-निर्माती म्हणून ओळखली जाते. विकी लालवानी सोबत बोलताना पूजाने बॉबी देओल सोबतच्या रिलेशनशिपच्या आठवणी जागवल्या.

बॉबी सोबतची रिलेशनशिप म्हणजे माझ्यासाठी ती आयुष्यातील जादुई वेळ होती. पूजा भट्टने दोघांचे मार्ग का वेगळे झाले? त्या बद्दलही सांगितलं. डॅडी चित्रपटातून डेब्यु केल्यानंतर तू महेश भट्ट यांचा आशिकी चित्रपट का नाकारला? याबद्दलही पूजा भट्टने सांगितलं.

अभिनयात करिअर करण्याबद्दल मी फार गंभीर नव्हते. कारण त्यावेळचा माझा प्रियकर चित्रपट क्षेत्रातील करिअरसाठी सपोर्टिंव नव्हता. तू बॉबी देओल बद्दल बोलतेस का? त्यावर तिने बॉबीशी भेट खूप नंतर झाली असं उत्तर दिलं.

"बॉबी देओलसोबत प्रेम संबंधांची पूजा भट्टने कबुली दिली. त्याच्या प्रेमात न पडण्यासारखं काही नव्हतं? तो माझ्या आयुष्यातील जादुई काळ होता. तो खरच जादुई माणूस होता. पण आज इथे बसून आमची रिलेशनशिप का तुटली? या बद्दल बोलणं योग्य होणार नाही" असं पूजा भट्ट म्हणाली.

"जे होतं ते होतं. आम्ही नाकारलेलं नाही. आज तो विवाहित आहे. दोन मोठ्या मुलांचा पिता आहे. त्याच्या करिअरला नवी दिशा मिळालीय. त्याची प्रगती झालीय त्या आनंदात तो आहे. एनिमल मधली त्याची भूमिका मला खूप आवडली. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे" असं पूजा भट्ट म्हणाली.