महिला अत्याचारावर असा चित्रपट बनवणार की…कुठलाही नराधम धाडसच करणार नाही; प्रवीण तरडेंनी केली घोषणा!
या चित्रपटात कायदा काहीही नसेल. हा सिनेमा रिलीज झाल्यावर आत्महत्या होणार नाहीत असे मला वाटते. हा सिनेमा आत्महत्या होऊ नये यासाठी महत्वाचा ठरेल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरींचा शैक्षणिक खर्च आमचे निर्माते करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा देऊळबंद-2 हा चित्रपट येत्या 21 मे 2026 रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या देऊळ बंद चित्रपटाच्या टीझर रिलीजसाठी संपूर्ण टीम अक्कलकोटमध्ये दाखल झाली होती.

यावेळी प्रवीण तरडे, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती. सध्या राज्यात महिला अत्याचारांच्या घटनांत वाढ झाली आहे. यावर भाष्य करताना तरडे यांनी मी लवकरच महिला अत्याचारावर एक चित्रपट करणार आहे, अशी घोषणा केली.

या चित्रपटात कायदा काहीही नसेल. हा सिनेमा रिलीज झाल्यावर आत्महत्या होणार नाहीत असे मला वाटते. हा सिनेमा आत्महत्या होऊ नये यासाठी महत्वाचा ठरेल, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरींचा शैक्षणिक खर्च आमचे निर्माते करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

एखाद्या चित्रपटाच्या भागात आशा नराधमांना चेचायला स्वामींना यावे लागेल. त्या चित्रपटात कोणताही कायदा वगैरे काही नसेल. या चित्रपटात नराधमांचे असे मृत्यू दिसतील की ते पाहून कोणाही नराधमाला अत्याचार करण्याचे धाडस होणार नाही, असेही यावेळी प्रविण तरडे म्हणाले.

दरम्यान, तरडे यांनी दिग्दर्शित केलेला देउळबंद-2 हा चित्रपट येत्या 21 मे रोजी चित्रपटग्रहांत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रविण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे, मोहन जोशी हे प्रमुख भूमिकेत असतील. तसेच महेश मांजरेकर, प्रसाद ओक, ओम भुतकर, मंगेश देसाई हेदेखील कलाकार चित्रपटात असतील.