Photo : भुरटे नव्हे… भुक्कड चोर…अलिशान बलेनो कारमधून आले अन् काय चोरलं? तुम्हीलाही हसू आवरणार नाही

पुण्यात अलिशान Baleno कारमधून आलेल्या चोरांनी चौकीदाराची LED सिग्नल स्टिक चोरली. महामार्गावरील हॉटेलबाहेर घडलेल्या या अनोख्या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. या 'भुक्कड' चोरीने अनेकांना हसू आवरणे कठीण झाले असून, चोरांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

| Updated on: Jun 15, 2026 | 3:09 PM
1 / 6
राज्यातच नव्हे तर जगात कुठे ना कुठे रोज चोरी होत असते. काही ना काही चोरीला जात असते. गरीबी, दारिद्र्य आणि इतर कारणामुळे या चोऱ्या होतात. चोरी कोणतीही असो, कारण कोणतंही असो त्याचं समर्थन करता येत नाही. चोरी ही चोरीच असते. इतरांच्या कष्टाच्या वस्तूंवर डल्ला मारणं हा गुन्हाच आहे. त्यामुळे चोरीला माफी नाहीच. पण काही चोर मात्र अत्यंत भुक्कड असल्याचं दिसून येतं. काय चोरायला येतील याचा काही नेम नाही.

2 / 6
पुण्यातही चोरी झाली. काही भुरटे चोर आले. त्यांनी चोरी केली. अलिशान बलेनो कारमधून आले होते. पण हे चोर सराईत चोर नसल्याचं दिसतं. त्यांनी जे चोरलं ते ऐकून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. हे चोर भुरटे नव्हे तर भुक्कड चोर निघाले. अत्यंत भुक्कड. एका गरीबाची एक वस्तू त्यांनी चोरली. सीसीटीव्हीत हे सर्व कैद झालं आहे.

3 / 6
भुरटे चोर काय चोरतील याचा नेम नाही. हेच पुण्यातील घटनेतून दिसून आलं आहे. पुणे-सातारा महामार्गावरील किकवी येथील सदगुरु व्हेज हॉटेलसमोरील अशाच एका चोरीची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. चोरून.. चोरून.. या भुरट्या चोरांनी कायं चोरलयं?.. तर हॉटेल चौकीदाराची एलईडी सिग्नल स्टिक चोरली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

4 / 6
महामार्गावर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने कारमधून आलेल्या काही व्यक्तींनी हॉटेल परिसरात कार थांबवली. त्यानंतर कारमधून उतरून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि संधी साधत त्यांनी थेट तेथील वॉचमनची एलईडी सिग्नल स्टिक चोरून कारमधून धूम ठोकली. हे सर्व सीसीटीव्हीच्या नजरेतून सुटलं नाही.

5 / 6
वॉचमनने हॉटेल समोरच्या त्याच्या खुर्चीवर ही एलईडी स्टिक ठेवली होती. वॉचमन हॉटेलमध्ये काही कामानिमित्ताने गेला होता. रात्री 11ची वेळ होती. त्यावेळी काही भुरटे चोर बलेनो कार मधून आले. त्यांनी पाहिलं, त्यांनी अंदाज घेतला आणि क्षणात 'एलईडी सिग्नल स्टिक' घेऊन धूम ठोकली.

6 / 6
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सीसीटीव्ही तपासल्यानंतर ही मजेशीर चोरीची घटना समोर आल्यानंतर परिसरात याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. सध्या ही घटना चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. तर काहींनी ह्या भुरट्या चोरांच्या मानसिकतेवरचं बोटं ठेवलं आहे.

Follow Us