दादा कोंडके यांचे भव्य स्मारक उभं राहणार… गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा पुढाकार

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदसम्राट दादा कोंडके यांचे सिनेमे प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. दादा कोंडके यांनी मराठी सिनेविश्वाला एक मोठ्या उंचीवर पोहोचवलं. आजही त्यांच्या मराठी सिनेविश्वातील योगदानाबद्दल बोललं जातं. आता त्यांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पुढाकार घेतला आहे.

| Updated on: Jun 07, 2026 | 2:41 PM
1 / 6
पुण्याच्या भोर तालुक्यातील इंगवली या दादा कोंडके यांच्या मुळ गावाला आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी भेट दिल्याची माहिती समोर येत आहे.  स्वर्गीय दादा कोंडके यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत चर्चा करण्यासाठी तसेच संभाव्य जागेची पाहणी करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी गावाला भेट दिली..

पुण्याच्या भोर तालुक्यातील इंगवली या दादा कोंडके यांच्या मुळ गावाला आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी भेट दिल्याची माहिती समोर येत आहे. स्वर्गीय दादा कोंडके यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत चर्चा करण्यासाठी तसेच संभाव्य जागेची पाहणी करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी गावाला भेट दिली..

2 / 6

यावेळी त्यांनी गावकऱ्यांसोबत संवाद साधत दादा कोंडके यांच्या स्मारकाबाबत त्यांनी चर्चा केली. महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरेल असे स्वर्गीय दादा कोंडके यांचे भव्य स्मारक भोरच्या इंगवली येथे उभारण्यात येईल,” असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले.

3 / 6

मराठी चित्रपट सृष्टीतले दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक स्वर्गीय दादा कोंडके यांचे भोरमधील इंगवली हे मूळ गाव असून अनेक मराठी हिट चित्रपटांची सुरुवात, शूटिंग ही दादा कोंडके यांनी इंगवली गाव पासून केली.. मात्र या गावात त्यांचं स्मारक अद्याप झालेल नाही..

4 / 6

त्या अनुषंगाने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या मूळ गावाला भेट देत पाहणी करत.. दादा कोंडके यांचा स्मारक उभारण्याचं गावकऱ्यांना आश्वासन दिले..

5 / 6

या पाहणी दौऱ्यावेळी भोरचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार राजेंद्र नजन तसेच विटा येथील उपजिल्हाधिकारी विक्रम बांदल यांच्यासह गावातील आणि तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते..

6 / 6

अभिनेते दादा कोडंके यांना आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. आजही दादांचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सासरचं धोतर’, ‘राम राम गंगाराम’, ‘ह्योच नवरा पाहिजे’ अशा सिनेमांमधून दादा कोंडके प्रेक्षकांच्या भेटीस आले. एक काळ असा होता जेव्हा दादा कोंडके यांच्या सिनेमांसाठी सत्तरच्या दशकातील तरूणाईच नव्हे तर ज्येष्ठत्वाच्या उंबरठ्यावरचे प्रेक्षकही दादांसाठी वेडे होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us