पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हने खळबळ, 19 वर्षीय पोराचा धुडगूस; हादवणारे फोटो समोर!
हा तरुण वेगात गाडी चालवत होता. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती गरवारे पुलावरून खाली कोसळली. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाच्या कारने पुलावरील रेलिंग तोडले आहेत.

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या अपघातात एकूण दोन निरापराध तरुणांचा जीव गेला होता. पोर्शे कारमध्ये बसलेला तरुण मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग करत होता. असेच एक प्रकरण आता पुण्यात समोर आले आहे.

पुण्यात पुन्हा एकदा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा प्रकार समोर आला आहे. एक १९ वर्षीय तरुण दारु पिऊन बेदरकारपणे वाहन चालवत होता. त्याचाच यात अपघात झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

हा तरुण वेगात गाडी चालवत होता. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती गरवारे पुलावरून खाली कोसळली. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाच्या कारने पुलावरील रेलिंग तोडले आहेत.

हा प्रकार समोर येताच पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अथर्व अमित जैन (१९) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनसार, ही घटना २५ मे रोजी रात्री १.३० पुण्यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ घडली.

संबंधित आरोपी तरुण हा जंगली महाराज रस्त्याचे डेक्कन जिमखाना येथून जात होता. रात्रीची वेळ असल्याने आरोपी त्याचे वाहन जंगली महाराज रस्त्याने जात असताना हा अपघात झाला.