पुण्यात मोठी दुर्घटना, खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू, थराराक घटना कॅमेऱ्यात कैद

Pune Shocking : पुण्यातील येरवड्यात खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झाला आहे. रिक्षाचा धक्का लागल्याने खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु 55 वर्षीय व्यक्तीच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

| Updated on: Oct 18, 2026 | 2:20 PM
1 / 5
पुण्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत मेनहोलचे झाकण नसल्याने एकाचा खड्डयात पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातूनही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईत मेनहोलचे झाकण नसल्याने एकाचा खड्डयात पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातूनही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

2 / 5

पुण्याच्या येरवडा परिसरात एका 55 वर्षीय व्यक्तीचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कामाच्या ठिकाणी सुरक्षितता नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

3 / 5

येरवडामधील मच्छी मार्केट परिसरात पालिकेने ड्रेनेजच्या कामासाठी खड्डा खोदला होता. या खड्ड्यात पडून प्रदीप परदेशी यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी घडली.

4 / 5

रिक्षाचा धक्का लागल्याने प्रदीप हे खड्ड्यात पडल्याचे सांगण्यात येत आहे. हा खड्डा 10 ते 15 फूट खोल होता. या खड्ड्याभोवती कोणती सुरक्षा नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

5 / 5

येरवड्यातील या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. आता या घटनेला जबाबदार कोण, असा सवाल केला जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us