PV Sandhu : 1.75 लाखांचा चेस बोर्ड, व्हिंटेज कार, स्वीमिंग पूल.. फराह खानने दाखवली पी. व्ही. सिंधूच्या आलिशान घराची झलक

PV Sandhu House Photos : फराह खान ही तिचा कूक दिलीपसोबत साथ बॅडमिंटनपटू स्टार पी.व्ही सिंधू आणि तिचा पती वेंकट दत्ता यांच्या बंगळुरूतील घरी पोहोचली. तिच्या व्लॉगमध्ये अनेक खास गोष्टी दिसल्या. चला टाकूया नजर..

| Updated on: Oct 23, 2026 | 8:20 PM
1 / 9
बॉलिवूडमधील कोरिओग्राफर- दिग्दर्शिक फराह खानचा व्लॉग खूप लोकप्रिया आहे. आत्तापर्यंत तिने अनेक सेलिब्रिटींची घर दाखवली आहेत. यंदा तिने व्लॉगमध्ये दोनदा ऑलिंपिक मेडल जिंकणारी बॅडमिंटनपटू  पी.व्ही. सिंधूच्या घराचं विहंगम दृश्य सर्वांना दाखवलं. तिथे ती तिचा कूक, दिलीपसोबत गेली होती. तिने सर्वांना सिंधूच्या सुंदर घराची झलक दाखवली. ज्यात मोठा स्वीमिंग पूलस पार्किंगमधली व्हिंटेज कार, पर्सनल शेफ आणि दीड लखांचा चेस बोर्डही आहे. ( All Photos : Youtube - Farah Khan)

बॉलिवूडमधील कोरिओग्राफर- दिग्दर्शिक फराह खानचा व्लॉग खूप लोकप्रिया आहे. आत्तापर्यंत तिने अनेक सेलिब्रिटींची घर दाखवली आहेत. यंदा तिने व्लॉगमध्ये दोनदा ऑलिंपिक मेडल जिंकणारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूच्या घराचं विहंगम दृश्य सर्वांना दाखवलं. तिथे ती तिचा कूक, दिलीपसोबत गेली होती. तिने सर्वांना सिंधूच्या सुंदर घराची झलक दाखवली. ज्यात मोठा स्वीमिंग पूलस पार्किंगमधली व्हिंटेज कार, पर्सनल शेफ आणि दीड लखांचा चेस बोर्डही आहे. ( All Photos : Youtube - Farah Khan)

2 / 9

फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये पी. व्ही. सिंधू आणि तिच्या पतीच्या घरात प्रवेश करताच, तिचं आणि तिच्या कुक दिलीपचं लक्ष पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या विंटेज फोक्सवॅगन बीटल कारकडे गेलं. ही कार पाहून दिलीपला अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पिवळ्या रंगाच्या बीटल कारची आठवण झाली.

3 / 9

यानंतर फराहने तिच्या व्लॉगमध्ये पी. व्ही. सिंधूच्या घरातील लिव्हिंग रूम दाखवली. या खोलीत मिंट ग्रीन रंगाचे सोफे असून, त्यावर विविध रंगांच्या फुलांची डिझाइन असलेल्या कुशन्स ठेवण्यात आल्या आहेत. खोलीतील मोठ्या खिडक्यांना पांढऱ्या रंगाचे पारदर्शक पडदे लावले आहेत. त्यामुळे खोलीत भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो.

4 / 9

त्यानंतर फराह त्यांच्या डायनिंग एरियामध्ये पोहोचली. तिथे तपकिरी रंगाच्या फिनिशिंगचं डायनिंग टेबल ठेवण्यात आलं आहे. त्यासमोर काचेचे दरवाजे असून, त्यातून बाहेर असलेल्या मोठ्या स्विमिंग पूलचं सुंदर दृश्य दिसतं.

5 / 9

सिंधूच्या घराबाहेर स्विमिंग पूलजवळ बसण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. या परिसरात हिरवीगार झाडं आणि रोपं लावण्यात आली आहेत. त्यामुळे ही जागा अतिशय शांत आणि खासगी वाटते. घरातील ड्रॉइंग रूम आणि डायनिंग एरियामधून इतर खोल्यांकडे जाण्यासाठी एक पॅसेज आहे. या पॅसेजच्या भिंतींवर पी. व्ही. सिंधूचे फोटो फ्रेम करून लावण्यात आले आहेत.

6 / 9

पी. व्ही. सिंधूच्या घरातील सर्वात खास गोष्टींपैकी एक म्हणजे महाभारताच्या थीमवर आधारित लिमिटेड एडिशन बुद्धिबळाचा पट. या बुद्धिबळाच्या पटाची किंमत जवळपास 1.75 लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं. घराची सफर घडवताना सिंधू आणि तिच्या पतीने या खास कलेक्टिबलची झलकही दाखवली. वेंकट दत्ता यांनी सांगितलं की, या बुद्धिबळाच्या पटावर महाभारतातील कथा साकारण्यात आली आहे. त्यामध्ये पांडव आणि कौरव यांना दाखवण्यात आलं आहे. हे पाहून फराह खानही खूप प्रभावित झाली. तिने हा संग्रहातील एक खास आणि अतिशय सुंदर वस्तू असल्याचं म्हटलं.

7 / 9

पी. व्ही. सिंधूच्या घराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचा वैयक्तिक शेफ. फराह खानने सिंधू आणि तिच्या पतीच्या घराचं कौतुक करताना सांगितलं की, तिच्या टीमने आतापर्यंत ज्या घरांना भेट दिली, त्यापैकी हे सर्वात सुंदर घर आहे.

8 / 9

घराची सफर घडवताना पी. व्ही. सिंधू आणि वेंकट दत्ता यांनी तिच्या कारकिर्दीशी संबंधित एक रंजक किस्साही सांगितला. त्यांनी सांगितलं की, सिंधूने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पायाला फ्रॅक्चर झालेलं असतानाही सुवर्णपदक जिंकलं होतं. वें

9 / 9

वेंकट दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील क्वार्टर फायनलच्या पहिल्या गेमदरम्यान सिंधूच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र तिला सुवर्णपदक जिंकायचं होतं. त्यामुळे दुखापत होऊनही तिने वेदना सहन करत सलग तीन दिवस सामने खेळले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us