‘या’ मराठी अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र

मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकाराच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त राज आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले. अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी शर्मिला आणि रश्मी ठाकरेसुद्धा उपस्थित होत्या.

Updated on: Nov 10, 2025 | 10:43 AM
1 / 5
मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावेनं रविवारी 9 नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र दिसले.

2 / 5
मुंबईतल्या अंधेरी इथल्या हॉटेलमध्ये सुबोध भावेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राज आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित उपस्थिती पहायला मिळाली. सार्वजनिक कार्यक्रमात तिसऱ्यांदा ठाकरे बंधू एकत्र आले होते.

3 / 5
सुबोध भावेचा 50 वा वाढदिवस असल्याने अंधेरीतल्या हॉटेलमध्ये जंगी सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलं होतं. या सेलिब्रेशनला अनेक सिनेकलाकारसुद्धा उपस्थित होते. त्याचसोबत राज आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, उद्धव आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेसुद्धा हजर होते.

4 / 5
सुबोध भावेच्या वाढदिवसाला खासदार नरेश मस्के यांचीदेखील उपस्थिती पहायला मिळाली. ठाकरे बंधू यांची उपस्थिती असतानाच शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनीदेखील सुबोध भावे यांची भेट घेतली. ठाकरे बंधू एकत्रित असतानाच नरेश मस्के देखील त्याच समारंभात उपस्थित होते.

5 / 5
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज आणि उद्धव ठाकरे सर्वांत आधी एकत्र एकाच मंचावर आले. त्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र दिवाळी साजरी केली. आता तिसऱ्यांदा राज आणि उद्धव ठाकरे एका सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आल्याचं पहायला मिळालं आहे.