
Dhurandhar 2 Vs Toxic : मार्च महिना चित्रपटाच्या दृष्टीने खूप खास असणार आहे. कारण या महिन्यात दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. धुरंधर 2 यात रणवीर सिंह लीड रोलमध्ये आहे आणि दुसरा टॉक्सिक. यात साऊथ सुपरस्टार यश आहे.

'धुरंधर 2' आणि 'टॉक्सिक हे दोन्ही चित्रपट एकाचदिवशी 19 मार्चला रिलीज होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांचा क्लॅश होणार आहे. अशावेळी या दोन्ही चित्रपटांबद्दल भरपूर चर्चा आहे. दोन्ही चित्रपट मोठ्या प्रमाणात बनवण्यात आले आहेत.

यश आणि रणवीरमध्ये बॉक्स ऑफिसचा धुरंधर कोण बनणार?. कुठला चित्रपट जास्त कलेक्शन करणार? हे तर प्रदर्शनानंतरच समजेल. पण सध्या हे समजून घेऊया की, दोन्ही चित्रपटांपैकी जास्त पैसा कुठला चित्रपट बनवण्यावर खर्च झालाय.

गीतू मोहनदास यांच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या 'टॉक्सिक' चित्रपटात यश सोबत कियारा आडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया, हुमा कुरैशी सारख्या चार मोठ्या अभिनेत्री आहेत. रिपोर्टनुसार या फिल्मचं बजेट जवळपास 500 कोटी रुपये आहे.

'टॉक्सिक' च्या तुलनेत'धुरंधर 2' चं बजेट कमी आहे. 'धुरंधर 2' चं बजेट किती आहे, या बद्दल ठोस माहिती नाहीय. कारण याची शूटिंगही पहिल्या पार्ट सोबत झाली होती. रिपोर्टनुसार दोन्ही पार्टवर 300-350 कोटी रुपये खर्च झाला आहे.