Horoscope Today 16th July 2026 : मान मोडून काम करावं लागणार, या राशीसाठी आजचा दिवस भलताच… वाचा मेष ते मीनचं भविष्य

Horoscope Today 16th July 2026, Thursday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य. दैनिक राशिफल (Horoscope Today 16th July 2026 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे.

| Updated on: Jul 16, 2026 | 7:50 AM
1 / 12
मेष राशी (Aries Daily Horoscope) -  आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ठरणार. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. कामाच्या निमित्ताने धावपळ वाढेल, तर सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. कौटुंबिक व्यवसायात किरकोळ नुकसान होण्याची शक्यता असली तरी काळजी करण्याचे कारण नाही. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर पदोन्नतीसह चांगली संधी मिळू शकते. मुलांच्या संगतीकडे मात्र विशेष लक्ष द्या.

2 / 12
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) -  आज तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल आणि त्यामुळे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. घरासाठी नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. चविष्ट जेवणाचा आस्वाद घ्याल, पण पोटाशी संबंधित किरकोळ त्रास दुर्लक्षित करू नका. तुमच्या कामाचे कौतुक होण्याची आणि मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

3 / 12
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) -  आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलण्याची शक्यता आहे. नवीन कल्पना आणि नियोजनामुळे कामात चांगली प्रगती होईल. अनावश्यक वाद टाळणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल आणि किरकोळ मतभेदही सहज मिटतील.

4 / 12
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) -  आज मन काहीसे अस्वस्थ राहील. कामात बदल करण्याचा विचार मनात येईल, मात्र मोठे निर्णय सध्या पुढे ढकललेलेच योग्य ठरतील. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि त्यांचा सल्ला व्यवसायात उपयोगी पडू शकतो. सासरच्या मंडळींसोबत आर्थिक व्यवहार टाळणे हिताचे ठरेल.

5 / 12
सिंह राशी (Leo Daily Horoscope) - यश मिळवण्यासाठी आज पूर्ण एकाग्रतेने काम करणे आवश्यक आहे. प्रभावशाली व्यक्तींशी झालेली भेट भविष्यात फायदेशीर ठरू शकते. बोलताना संयम राखा, कारण तुमचे शब्द इतरांवर प्रभाव टाकू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल. सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. कार्यक्षेत्रात एखाद्याच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते.

6 / 12
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) -  आज खूप व्यस्त राहाला. मान मोडून काम करावं लागेल. अनेक जबाबदाऱ्यांमुळे धावपळ वाढेल. मित्रांसोबत छोटेखानी भेट किंवा कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. घाईघाईने निर्णय घेणे टाळा, अन्यथा घरात वाद निर्माण होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित निर्णयही शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या.

7 / 12
तुळ राशी (Libra Daily Horoscope) -  आज विरोधकांवर तुमचे वर्चस्व राहील. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. मात्र, एखादे काम शेवटच्या क्षणी अडकण्याची शक्यता असल्याने सतर्क राहा. कुटुंबात शुभकार्याची तयारी सुरू होऊ शकते. तुमची निर्णयक्षमता आज अनेक बाबतीत फायदेशीर ठरेल.

8 / 12
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) - चांगल्या बातम्यांमुळे उत्साह वाढेल. व्यवसायात घेतलेले योग्य निर्णय लाभदायक ठरतील. जुन्या अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. मुलांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. स्वतःसाठी नवीन कपडे किंवा आवडते गॅजेट खरेदी करण्याचाही योग आहे.

9 / 12
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) - आज आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. नियोजनबद्ध खर्च केल्यास आर्थिक समतोल राखता येईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. घरातील महत्त्वाच्या विषयावर आई-वडिलांशी चर्चा होऊ शकते. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती भविष्यात उपयुक्त ठरेल.

10 / 12
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) -  व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल.  दूर राहणाऱ्या नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. वैयक्तिक माहिती इतरांसोबत शेअर करणे टाळा. शिक्षणाशी संबंधित अडचणी दूर होतील. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील जुने मतभेद मिटवण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे.

11 / 12
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) - रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत काही आव्हाने समोर येतील, पण संयम आणि योग्य नियोजनामुळे त्यावर मात करता येईल. कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास दिवस यशस्वी ठरेल. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

12 / 12
मीन राशी (Pisces Daily Horoscope) - आजूबाजूच्या लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि लपलेले विरोधक ओळखा. मनात मत्सर किंवा द्वेष न ठेवता सकारात्मक विचार करा. छंद आणि मनोरंजनासाठी खर्च होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल आणि नात्यातील जवळीक वाढेल.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us