RBI ची मोठी कारवाई! ‘या’ बँकेला मोठा दणका, ग्राहक खात्यातून फक्त 5000 रुपये काढू शकतात

RBI ने एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. पुदुच्चेरीमधील सहकारी बँकेला मोठा दणका देत निर्बंध लादली आहेत. निर्बंधानुसार ग्राहक खात्यातून फक्त 5000 रुपये काढू शकतात.

| Updated on: Oct 22, 2026 | 7:56 AM
1 / 5
भारतीय रिझर्व्ह बँकेने पुदुच्चेरी सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. बँकेची  आर्थिक स्थिती बिघडल्याने आरबीआयने अनेक निर्बंध लादले आहेत.

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुदुच्चेरी सहकारी बँकेवर मोठी कारवाई केली आहे. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्याने आरबीआयने अनेक निर्बंध लादले आहेत.

2 / 5

नव्या निर्बंधानुसार बँक खात्यातून जास्तीत जास्त 5000 रुपये काढू शकतात. आरबीआयने लादलेले निर्बंध 21 ऑक्टोबर 2026 पासून पुढील सहा महिने लागू राहील. बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा देखील घेतला जाईल.

3 / 5

आरबीआयने म्हटलं की, पुदुच्चेरीतील सहकारी बँकेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी बँकेचं संचालक मंडळ आणि व्यवस्थापनाची चर्चा केली होती. बँकेने ठेवीदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले नव्हते. त्यामुळे बँकेवर निर्बंध लादण्याची वेळ आली. त्यानुसार, बँकेला कर्ज, आगाऊ रक्कम देणे, संपत्ती ट्रान्सफर करण्यावर बंधने लादली आहेत.

4 / 5

आरबीआयने स्पष्ट केले की, बचत खाते, चालू खाते किंवा कोणत्याही दुसऱ्या खात्यातून 5000 रुपयांहून अधिक रक्कम काढण्यावर निर्बंध लादले आहेत. बँकेवरील फिक्स डिपॉजिट्वर व्याजदराबाबत नवीन नियम निश्चित केले आहेत.

5 / 5

आरबीआयच्या कारवाईमुळे ग्राहकांना खात्यातून पैसे काढण्यावर मर्यादा येणार आहेत. विशेष म्हणजे बँक खात्यातून पैसे बुडण्याची भीती कमी आहे. नियमानुसार प्रत्येक खातेदारांच्या खात्यातील 5 लाखांपर्यंतच्या रक्कमेस सुरक्षा मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us