Whisky Price : 350 रुपयांची व्हिस्की तुम्हाला 1500 रुपयांना का मिळते? 99 टक्के लोकांना माहितीच नाही!

देशात लाखो मद्यपी आहेत. पण ते खरेदी करत असलेल्या एका मद्याच्या बॉटलची खरी किंमत लक्षात घेऊन सर्वांनाच धक्का बसेल. विशेष म्हणजे मद्याची मूळ बॉटल खूपच स्वस्त असते.

| Updated on: Jan 01, 2026 | 5:07 PM
1 / 5
भारतात मद्यविक्रीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत मोठा निधी जमा होतो. मद्यावर जीएसटी लागत नाही. परंतु मद्यावर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रमाणात कर आकरला जातो. म्हणूनच काही राज्यात एखाद्या मद्याची बॉटल महाग असते तर तीच मद्याची बॉटल अन्य राज्यात खूप स्वस्त असते.

2 / 5
एका मद्याच्या बॉटलवर वेगवेगळ्या प्रकारचे कर लागतात. यामध्ये एक्साईज ड्यूटी, व्हॅट, ट्रान्सपोर्ट चार्जेस अशा वेगवेगळ्या कराचा समावेश असतो. मद्याच्या अनेक बॉटल्सवर तर एकूण किमतीपैकी 60 ते 80 टक्के रक्कम ही कराचीच असते. उदाहरणादखल दिल्लीमध्ये मद्याच्या एका बॉटलवर 60 ते 75 टक्के कर असतो.

3 / 5
कर्नाटक आणि तामिळनाडू येथे मद्याच्या एक बॉटलवरील कराची रक्कम ही 70 टक्क्यांपेक्षा जास्त असते. एका 1500 रुपयांच्या व्हिस्कीच्या बॉटलवर लागणारा कर समजल्यावर तर तुम्हाला थक्काच बसेल. हा कर नसेल तर तुम्हाला 1500 रुपयांची बॉटल फक्त 350 ते 500 रुपयांना मिळू शकेल.

4 / 5
मद्य, बॉटल, झाकण, लेबल, पॅकेजिंग या गोष्टी लक्षात घेऊनच कोणत्याही मद्याची मूळ किंमत निश्चित केली जाते. 1500 रुपये किंमत असणारी एक व्हिस्की मद्याच्या बॉटलची मूळ किंमत सधारण 350 ते 500 रुपये असते. परंतु ही व्हिस्कीची बॉटल विक्रीसाठी बाहेर पडल्यावर राज्यांचा कर तसेच अन्य पैसे मिसळले जातात. म्हणूनच तुमच्या हातात येईपर्यंत 350 ते 500 रुपये किंमत असणाऱ्या व्हिस्कीचा भाव थेट 1500 रुपयांपर्यंत जातो.

5 / 5
(टीप- मद्यपान आरोग्यास हानिकारक असते. मद्यपान केल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात. मद्यपानास प्रोत्साहित करण्याचा आमचा उद्देश नाही.)