पिवळ्या रंगाची केळी खाण्यापेक्षा लाल रंगाची केळी खाण्यास करा सुरुवात, फायदे वाचून व्हाल थक्क

पिवळ्या रंगाच्या केळी खाण्यापेक्षा लाल रंगाची केळी खायला सुरुवात करा. फायदे वाचूनच व्हाल थक्क. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Apr 14, 2026 | 4:08 PM
1 / 5
केळी हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ मानलं जातं. शरीराला झटपट ऊर्जा देण्यासोबतच गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठीही केळी खूप फायदेशीर ठरते. आतापर्यंत आपण पिवळी केळी किंवा कच्च्या केळ्याची भाजी खाल्ली असेल, पण लाल केळी ही देखील त्याहून अधिक पौष्टिक असल्याचं सांगितलं जातं.

केळी हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ मानलं जातं. शरीराला झटपट ऊर्जा देण्यासोबतच गोड खाण्याची इच्छा कमी करण्यासाठीही केळी खूप फायदेशीर ठरते. आतापर्यंत आपण पिवळी केळी किंवा कच्च्या केळ्याची भाजी खाल्ली असेल, पण लाल केळी ही देखील त्याहून अधिक पौष्टिक असल्याचं सांगितलं जातं.

2 / 5

लाल केळी प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, मेक्सिको आणि अमेरिका या देशांत पिकवली जाते. मात्र आता भारतातही त्याची लागवड सुरू झाली असून, हळूहळू ती बाजारात उपलब्ध होऊ लागली आहे.

3 / 5

लाल केळीमध्ये कॅरोटेनॉइड्स, व्हिटॅमिन C आणि अँथोसायनिनसारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. लाल केळीमध्ये व्हिटॅमिन A आणि कॅरोटेनॉइड्स मुबलक प्रमाणात असल्यामुळे ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नियमित सेवन केल्यास दृष्टी सुधारण्यास मदत होते.

4 / 5

या केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होऊ शकतो. तसेच पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

5 / 5

तसेच आतड्यांतील सूज कमी करून पचनसंस्था मजबूत करण्यास मदत होते. लाल केळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यात व्हिटॅमिन C आणि बीटा-कॅरोटीन असल्यामुळे शरीराला संसर्गांपासून संरक्षण मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us