Remo Dsouza Bungalow Tour: रेमो डिसूझाच्या भव्य बंगल्यात जगातील सर्वात छोटा शिवलिंग, एन्ट्रीवर मदर मेरीची मुर्ती, इंटेरियर लक्ष वेधणारं

रेमो याची पत्नी क्रिश्चियन आहे, रेमो याने सुद्धा आता धर्म बदलून हिंदूवरून क्रिश्चियन धर्म स्वीकारला आहे. रेमा आणि लिजेल त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मदर मेरीची एक मोठी मूर्ती लावली आहे.
घराच्या आत एक मोठे मंदिरही बनवलं आहे, जिथे गणपतीची स्थापना केली आहे. रेमो यांनी सांगितलं की, तो रोज सकाळी उठून सर्वात आधी मंदिरात पूजा करतो.
घराच्या ग्राउंड फ्लोरवर रेमो याने एक मोठा, ग्रँड आणि आलिशान बसण्याची जागा (सिटिंग एरिया) तयार केली आहे. जिथे ते कुटुंब आणि मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवतात.
रेमो आणि लिजेल यांच्या घरात एक मोठे शिवलिंग मंदिरही बनले आहे. दोघेही दररोज येथे पूजा करतात. मंदिरात जगातील सर्वात छोटं शिवलिंग आहे.
लिजेल यांनी 'कर्ली टेल्स'सोबतच्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांच्या घरात जगातील सर्वात लहान शिवलिंग सुद्धा आहे. त्यांनी सर्वात लहान शिवलिंग कॅमेऱ्यावरही दाखवलं होतं.