Rinku Rajguru: बर्थडेच्या एक आठवड्यानंतर रिंकूने दिले मोठं सरप्राईज, म्हणाली ‘आता फॅमिली मोठी झाली!’

Rinku Rajguru: सध्या सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु चांगलीच चर्चेत आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने गूडन्यूज दिली आहे.

| Updated on: Jun 11, 2026 | 11:57 AM
1 / 5
अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच २५ वर्षांची झाली आहे. ३ जून रोजी तिने आपला २५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानंतर बरोबर एक आठवड्याने तिने सोशल मीडियावर एक गूड न्यूज शेअर केली आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच २५ वर्षांची झाली आहे. ३ जून रोजी तिने आपला २५वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानंतर बरोबर एक आठवड्याने तिने सोशल मीडियावर एक गूड न्यूज शेअर केली आहे.

2 / 5

रिंकूने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत सांगितले की, सकाळी उठल्यावर तिला सर्वोत्तम सरप्राइज मिळाला आहे. तिने म्हटले, "आता आमचे कुटुंब मोठे झाले आहे!"

3 / 5

ही बातमी ऐकल्यावर अनेकांना वाटले की रिंकूच्या आयुष्यात नवीन सदस्याची (रिलेशनशिपची) एंट्री झाली असावी. पण प्रत्यक्षात ही गूड न्यूज तिच्या पेट डॉग्सशी संबंधित आहे. रिंकूच्या पेट डॉगला ६ पिल्लं झाली आहेत.

4 / 5

रिंकूने पेटचे फोटो शेअर करत याबाबत लिहिले की, "आमची फर्री फॅमिली आता बिग झाली आहे!"

5 / 5

रिंकू आपल्या पेट डॉग्सबद्दल नेहमीच सोशल मीडियावर प्रेमाने पोस्ट करते. तिच्या चाहत्यांना ही तिच्या ‘फर्री बेबीज’ची बातमी ऐकून खूप आनंद झाला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us