दारू-गुटखा खाणारा हिरो, प्रेमात पडली हिरोईन अन् होतो नको तो कांड! ZEE 5 वर आला जबरदस्त मराठी चित्रपट

एक जबरदस्त मराठी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म झी 5वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आता चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहा..

| Updated on: Apr 14, 2026 | 5:55 PM
1 / 5
मराठी सिनेमे आता थिएटरमधून थेट OTT प्लॅटफॉर्मवर येण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला एक धमाकेदार मराठी चित्रपट आता प्रेक्षकांसाठी ZEE 5 मराठीवर उपलब्ध झाला आहे.

2 / 5
या चित्रपटाची कहाणी पूर्णपणे वेगळी आणि वास्तवदर्शी आहे. यातील नायक इतर नेहमीच्या हिरोंसारखा परफेक्ट नाही. तो दारू, सिगारेट, तंबाखू आणि गुटखा खाणारा, रियल-लाइफ स्टाइल असलेला तरुण आहे. अशा मुलाच्या प्रेमात एक मुलगी पडते आणि दोघांची लव्ह स्टोरी सुरू होते. पण नंतर या प्रेमकथेत नको तो कांड घडतो.

3 / 5
आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव ‘रुबाब’ असे आहे. या चित्रपटात प्रेम, नाट्य, अहंकार, स्वाभिमान आणि नातेसंबंधांच्या गुंतागुंतीची अतिशय सुंदर मांडणी करण्यात आली आहे. सूरज आणि वैशाली या दोन ठाम स्वभावाच्या व्यक्तींचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात आला आहे. प्रेमामुळे एकत्र येणारे हे दोघे, आपल्या अहंकार आणि स्वभावामुळे आपल्या नात्याला कसोटीला लावतात.

4 / 5
चित्रपटात प्रेम, भावना, संघर्ष आणि काही अॅक्शन क्षणांचा छान समतोल साधण्यात आला आहे. तो फक्त एक साधी लव्ह स्टोरी नाही, तर ओळख, महत्त्वाकांक्षा आणि स्वाभिमान टिकवण्यासाठी मोजावी लागणारी किंमत यावरही गहन भाष्य करतो.

5 / 5
या चित्रपटात संभाजी ससाणे, शीतल पाटील, विशाल शिर्टोडे, अभिजीत साकटे आणि सिमरन खेडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. थिएटरमध्ये दमदार यश मिळवून आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून हा चित्रपट आता ZEE 5 मराठी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. जर तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकला नसाल, तर आता ZEE 5 मराठीवर सहज पाहू शकता. वास्तववादी कथा, जबरदस्त अभिनय आणि भावनिक गहराई असलेला हा मराठी चित्रपट एकदा नक्की पहा!

Follow Us