‘लपंडाव’ मालिकेत मोठा ट्विस्ट; रुपाली भोसलेचं वेषांतर, अभिनय ठरतोय गेमचेंजर!

'लपंडाव' या मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पहायला मिळणार आहे. तेजस्विनीच्या अपहरणासाठी मनस्विनी वेषांतर करते आणि तिचा हा नवा अवतार कसा असेल, ते जाणून घ्या..

| Updated on: Apr 14, 2026 | 1:36 PM
1 / 5
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लपंडाव' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेतील तेजस्विनी आणि मनस्विनी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच रंजक होत असून दुहेरी भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लपंडाव' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. या मालिकेतील तेजस्विनी आणि मनस्विनी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच रंजक होत असून दुहेरी भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलेच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

2 / 5

दुहेरी भूमिका साकारणं हे कोणत्याही कलाकारासाठी मोठं आव्हान असतं. याबद्दल रुपाली सांगते, "तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्तिरेखा आहेत. एकाच दिवशी या दोन्ही भूमिका साकारताना खूप कसरत करावी लागते."

3 / 5

"दोघींचे लूक, देहबोली, आवाज सगळंच वेगळं ठेवावं लागतं. तेजस्विनीचा लूक अत्यंत क्लासी आणि एलिगंट आहे. तिच्या साड्या, दागिने आणि मेकअपमध्ये एक शाही अंदाज दिसतो. त्याच्या अगदी विरुद्ध मनस्विनीचा लूक साधा आणि नैसर्गिक आहे. मनस्विनी साकारताना ‘नो मेकअप’ लूक ठेवला जातो, त्यामुळे त्या व्यक्तिरेखेत सहजता येते," असं ती म्हणाली.

4 / 5

याविषयीचा अनुभव सांगत रुपाली पुढे म्हणाली, "या दोन्ही भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारल्या जात आहेत की प्रेक्षक प्रत्यक्ष भेटल्यावर तुम्ही खरंच जुळ्या बहिणी आहात का? असा प्रश्न विचारतात. हे कौतुक जितकं आनंद देणारं आहे, तितकंच हे काम शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दमछाक करणारंही आहे. मात्र, कलाकार म्हणून मिळणारं समाधान हे सगळ्या मेहनतीचं चीज करतं."

5 / 5

या मालिकेत लवकरच एक धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तेजस्विनीचं अपहरण करण्यासाठी मनस्विनी भांडीवालीचं वेषांतर करणार आहे. रुपालीचा हा नवा अवतार प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे. लपंडाव ही मालिका दुपारी 2 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us