सचिन, सुप्रिया, श्रिया यांच्याशिवाय पिळगावकरांच्या घरात कोणाची हुकूमत? दरवाजावरील पाटीमुळे रंगली चर्चा

अभिनेते सचिन पिळगांवकर यांच्या कुटुंबातील एका खास सदस्याची सध्या चर्चा होत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सदस्याबद्दल एक मजेशीर खुलासा केला आहे.

| Updated on: Oct 19, 2026 | 9:24 AM
1 / 5
सचिन पिळगांवकर, पत्नी सुप्रिया आणि मुलगी श्रिया यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबात आणखी एक सदस्य आहे. त्याचं नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सचिन पिळगांवकर, पत्नी सुप्रिया आणि मुलगी श्रिया यांच्याबद्दल अनेकांना माहिती आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबात आणखी एक सदस्य आहे. त्याचं नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

2 / 5

सचिन पिळगांवकर यांच्या घरातील या सदस्याचं नाव जॅक पिळगांवकर आहे. जॅक हा त्यांच्या घरातील पाळीव कुत्रा आहे. त्याचं कुटुंबातील स्थानही खास आहे.

3 / 5

सचिन यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यांच्या घराला 2 दरवाजे आहेत. एका दरवाजातून पाहुणे येतात, तर दुसऱ्या दरवाजाचा वापर जॅक करतो. त्या दरवाजावर ‘जॅक पिळगांवकर’ अशी पाटी लावण्यात आली आहे.

4 / 5

सचिन यांनी आपल्या कुटुंबाच्या प्राणीप्रेमाबद्दलही सांगितलं. ते म्हणाले की, "आम्ही सगळी पिळगांवकर फॅमिली प्राणीप्रेमी आहोत, त्यात सर्वात जास्त प्राणीप्रेमी आमची मुलगी आहे." त्यांच्या या वक्तव्यावरून कुटुंबातील प्राण्यांबद्दलचं प्रेम दिसून येतं.

5 / 5

सचिन पिळगांवकर यांचा ‘कापूसकोंडा’ हा कौटुंबिक चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात एका कुत्र्याचाही समावेश आहे. याच निमित्ताने झालेल्या मुलाखतीत त्यांनी जॅकबद्दलची ही रंजक माहिती सांगितली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us