Sachin Pilgaonkar : त्यांच्यासमोर मानसन्मान स्वीकारताना Embarrassing वाटतं’, सचिन पिळगांवकर असं कोणाबद्दल म्हणाले ?
सचिन पिळगांवकर यांनी पत्नी सुप्रिया आणि मुलगी श्रिया यांच्या प्रतिभेबद्दल केलेला खुलासा सध्या चर्चेत आहे. स्वतःपेक्षा घरातच अधिक गुणी कलाकार असल्याचं सांगताना त्यांनी नेमकी कोणती खास भावना व्यक्त केली? जाणून घ्या...

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी पत्नी सुप्रिया आणि मुलगी श्रिया यांच्या कलागुणांचं मनापासून कौतुक केलं आहे. आपल्या घरात आपल्यापेक्षा अधिक प्रतिभावान कलाकार असल्याचं सांगताना त्यांनी एक खास भावना व्यक्त केली.
सचिन पिळगांवकर यांनी सुप्रिया यांच्या अभिनयाचं कौतुक करत त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री असल्याचं मान्य केलं. त्यांच्या नात्याची सुरुवात सुप्रिया यांच्या कामाविषयी वाटणाऱ्या आकर्षणातून झाली होती, असा किस्साही त्यांनी सांगितला.
अभिनेत्री श्रिया पिळगांवकर हिने मनोरंजनविश्वात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या यशासाठी आई-वडिलांना कोणतीही शिफारस करावी लागली नाही, याचा सचिन यांना विशेष अभिमान आहे.
आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनासाठी अनेक सन्मान मिळवलेल्या सचिन पिळगांवकर यांनी पुरस्कारांबद्दल एक वेगळीच भावना व्यक्त केली. घरातच आपल्यापेक्षा अधिक प्रतिभावान दोन व्यक्ती असल्याची जाणीव झाल्याने कधी कधी सन्मान स्वीकारताना संकोच वाटतो, असं ते म्हणाले.
सचिन पिळगांवकर यांनी मुलगी श्रियाच्या जन्माचा आणि त्याच दिवशी मिळालेल्या पुरस्काराच्या आनंदाचा खास अनुभव सांगितला. एका बाजूला मुलीच्या जन्माची आनंदवार्ता, तर दुसरीकडे सचिन आणि सुप्रिया यांना मिळालेला पुरस्कार, यामुळे तो दिवस त्यांच्या आयुष्यात कायमचा लक्षात राहिला.
सचिन पिळगांवकर यांचा आगामी ‘कापूसकोंडा’ हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या कुटुंबातील कलाकारांविषयी व्यक्त केलेल्या भावना चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.