Sachin Tendulkar son Arjun Wedding : राज ठाकरेंपासून राहुल द्रविडपर्यंत सचिनच्या लेकाच्या लग्नात दिग्गजांची मांदियाळी; अख्खं क्रिकेट जगत अवतरलं

Arjun Tendulkar- Sania Chandok Wedding : सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या आनंदोत्सवात क्रिकेट जगतातील एमएस धोनी, सुनील गावस्कर यांसारख्या दिग्गजांसह, अंबानी कुटुंब, राज ठाकरे आणि बच्चन कुटुंबियांनीही उपस्थिती लावली. मेहंदी, संगीत कार्यक्रमापासून ते मुख्य विवाह सोहळ्यापर्यंत सेलिब्रिटींच्या उपस्थितीने या लग्नाची शान वाढवली.

| Updated on: Mar 05, 2026 | 1:47 PM
1 / 11
क्रिकेटचा देव मानला जाणारा, सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकरच्या घरात आनज आनंद, उत्साहाचं वातावरण आहे. सचिन व अंजलीचा मुलगा अरुजन याचं, 5 मार्च रोजी सानिया चांडोकशी लग्न होणार आहे. या लग्नास उपस्थित राहून अर्जुन आणि सानियाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले.  (Photo : Social Media)

क्रिकेटचा देव मानला जाणारा, सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकरच्या घरात आनज आनंद, उत्साहाचं वातावरण आहे. सचिन व अंजलीचा मुलगा अरुजन याचं, 5 मार्च रोजी सानिया चांडोकशी लग्न होणार आहे. या लग्नास उपस्थित राहून अर्जुन आणि सानियाला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी आले. (Photo : Social Media)

2 / 11

हरभजन सिंग, इरफान पठाण आणि युवराज सिंग यांच्यासह इतरांनी अर्जुन सानियाच्या मेहंदी आणि संगीत समारंभात हजेरी लावली होती. तर आज लग्न समारंभासाठी अनेक दिग्गज क्रिकेटपटू,सेलिब्रिटी देखील आले.

3 / 11

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सचिनच्या लेकाला हजेरी लावली. सचिन व राज ठाकरेंचा फोटो खूप व्हायरल झाला.

4 / 11

अर्जुन व सानिया या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी बच्चन कुटुंबही आवर्जून आलं. अमिताभ बच्चन , जया बच्चन, अभिषेक आणि ऐश्वर्या हे चौघेही हसतमुखाने लग्नासाठी पोहोचले.

5 / 11

भारताला टी20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवून देणारा एमएस धोनी हा त्याची पत्नी साक्षी धोनीसह अर्जुन आणि सानियाच्या लग्नाला उपस्थित होता.

6 / 11

अंबीन कुटुंबाशी सचिनचं विशेष नातं. मुकेश अंबानी हे पत्नी, लेक व सुनेसह या कुटुंबाला आवर्जून हजर होते.

7 / 11

भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे हा पत्नीसह अर्जुन आणि सानियाच्या लग्नात दिसला.

8 / 11

भारताचा दिग्गज खेळाडू आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील सचिनच्या लेकाच्या , अर्जुन तेंडुलकरच्या लग्नासाठी सपत्नीक पोहोचला.

9 / 11

भारताचा दिग्गज लेग स्पिनर अनिल कुंबळे त्याच्या पत्नीसह अर्जुन आणि सानियाच्या लग्नासाठी उपस्थित होता.

10 / 11

माजी भारतीय वेगवान गोलंदाज आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद हे देखील सचिनच्या मुलाच्या लग्नाला त्याच्या कुटुंबासह उपस्थित होते.

11 / 11

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांच्या या खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर देखील पोहोचले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us